शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छप्परफाड रिटर्न! ‘या’ कंपनीचा १० पैशांचा शेअर गेला ५७१ ₹वर; १० हजारांचे झाले ५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:50 AM

1 / 9
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकांना झटपट चांगले रिटर्न्स मिळण्याची इच्छा असते. परंतु, शेअर मार्केटमध्ये संयम महत्त्वाचा असतो, असा सल्ला दिला जातो. आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत.
2 / 9
आठवडाभरात कमी झालेले खनिज तेलाचे दर, परकीय वित्तसंस्थांकडून झालेली खरेदी यामुळे शेअर बाजारामध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली आहे.
3 / 9
शेअर बाजाराचे भांडवलमूल्य ७१,९२९.२४ कोटी रुपयांनी वाढून २,६०,३७,७३०.७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहाला उधाण येऊ लागणार आहे. यातच काही कंपन्या दमदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे काही वर्षांत चांगले रिटर्न्स देत आहेत.
4 / 9
GRM Overseas ही कंपनी शेअर बाजारात कमाल कामगिरी करत आहे. १ एप्रिल २००४ रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ १० पैसे होती. मात्र, १७ मार्च २०२२ रोजी याच कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल ५७१ रुपयांवर गेली आहे.
5 / 9
याचाच अर्थ GRM Overseas कंपनीने सुमारे १८ वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ५.७१ लाख टक्क्यांचे बंपर रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला असल्याचे म्हटले जात आहे. २३ मार्च २०१२ रोजी या कंपनीचा शेअर १.८५ रुपयांवर होता.
6 / 9
आता १० वर्षानंतर GRM Overseas च्या शेअरची किंमत ५७१.९५ झाली आहे. गेल्या १० वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना ३० हजार ८१६ टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ५ वर्षांचा विचार करता, जीआरएम ओव्हरसिज कंपनीने गुंतवणूकदारांना ९ हजार ५४५ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
7 / 9
GRM Overseas च्या गुंतणूकदारांची छप्परफाड कमाई झाली आहे. एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअरची किंमत १० पैसे असताना १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर १८ वर्षांच्या कालावधीनंतर या गुंतवणूकदाराला तब्बल ५ कोटी ७२ लाख रुपये मिळाले असते, असे सांगितले जात आहे.
8 / 9
इतकेच नव्हे, तर एखाद्या व्यक्तींने १० पैशांच्या शेअरवर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता १८ वर्षांनी या व्यक्तीला ५७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता, असे सांगितले जात आहे. याच क्रमात एखाद्या व्यक्तीने एक हजाराची गुंतवणूक केली असती, तर त्याला ५७ लाख रुपये मिळाले असते.
9 / 9
GRM कंपनीची स्थापना १९७४ मध्ये झाली होती. जगभरातील देशांमध्ये तांदूळ निर्यातीचे काम ही कंपनी करते. कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा आणि प्रगतीकारक राहिला असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजार