शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 8:38 PM

1 / 8
वेदांत-फॉक्सकॉन समूहाच्या मोठ्या गुंतवणुकीनंतर आता गुजरातला पुन्हा एक मोठा प्रोडेक्ट मिळाला आहे. टाटा आणि एअरबसने गुजरातमध्ये 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
2 / 8
टाटा आणि एअरबस येथे लष्करासाठी वाहतूक करणारी विमाने तयार करणार आहेत. यासंदर्भात बोलताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले, हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. ज्याअंतर्गत खाजगी कंपनी लष्करात वापरली जाणारी विमाने तयार करेल.
3 / 8
या प्रोजेक्टसाठी एकूण 21,935 कोटी रुपये एवढा मोठा खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करतील. गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे, या प्रोजेक्टसंदर्भातही सरकार हजारो नोकऱ्यांची आश्वासने देत ​​आहे.
4 / 8
गेल्या सप्टेंबर महिन्यातच गुजरात सरकारने 1 लाख 54 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टसाठी वेदांत-फॉक्सकॉन ग्रुपसोबत करार केला होता. वेदांत लिमिटेड आणि तैवानची फॉक्सकॉन कंपनी एकत्रितपणे गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन करणार आहेत. अहमदाबादजवळ याचा प्लांट तयार केला जाणार आहे.
5 / 8
या कंपनीसोबत सरकारने विजेसंदर्भातही करार केला आहे. या प्रोजेक्टसाठी गुजरात सरकार वीजेबरोबरच इतर सुविधाही पुरवेल. या प्रोजेक्टमुळे जवळपास 1 लाख लोकांना रोजगार मिळेल असा दावा करण्यात येत आहे.
6 / 8
लष्करासाठी आवश्यक असणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानासंदर्भात दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी टाटा-एअरबस मदत करत आहे. यामुळे पंतप्रधानांच्य महत्वाकांक्षी 'मेकइन इंडिया' या अभियानालाही बळकटी मिळत आहे.
7 / 8
गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने एअरबस कडून 56 ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट खरेदी करण्याची घोषणा केली होती. करारानुसार, 16 विमाने लवकरच मिळणार असून उर्वरित विमाने भारतात तयार केली जाणार आहेत.
8 / 8
अधिकृत वक्तव्यानुसार, सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान 16 एअरक्राफ्ट रेडी कंडीशनमध्ये सुपूर्द केले जातील. तसेच गुजरातेत तयार करण्यात येणारे पहिले एअरक्राफ्ट सप्टेंबर 2026 पर्यंत मिळेल. लेटेस्ट सी 295 एअरक्राफ्ट हे एव्हरो एअरक्राफ्टची जागा घेईल जे अत्यंत जुने झाले आहेत.
टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीTataटाटाbusinessव्यवसायBJPभाजपा