Happiest minds technologies IT services firm IPO fully subscribed by retail investor
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट! By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 8:27 PM1 / 11हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजी या आयटी कंपनीचा आयपीओ आजच खुला झाला आणि छोट्या गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने सुपरहिटही झाला. विशेष म्हणजे इशू काही तासांतच 99 टक्क्यांपर्यंत भरला. छोटे गुंतवणूकदार या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे लावत आहेत. 2 / 11या पूर्वी, अँकर्स गुंतवणूकदारांकडूनही या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. वृत्तांनुसार, तो सुरुवातीच्या 3 तासांतच चार पटहून अधिक सब्सक्राइबही झाला आहे. यावरून या आयपीओसंदर्भात छोट्या गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा अंदाज लावला जाऊ शकतो. 3 / 11कोरोना संकटामुळे मार्च महिन्यांपासूनच आयपीओ बाजार थंड होता. मात्र, आता अनेक कंपन्या आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यातच आज (7 सप्टेंबर) Happiest Minds Technologiesने आयपीओ खुला केला आहे. 4 / 11हॅपिएस्ट माइँड्स टेक्नोलॉजीच्या आयपीओमध्ये छोट्या गुंतवणूकदारांना 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत सब्सक्राईब करण्याची संधी मिळेल. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची जबरदस्त चर्चा सुरू आहे.5 / 11हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलजीने (Happiest Minds Technologies) शेअरसाठी प्राइस बँड 165-166 रुपये ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान 90 शेअर्ससाठी आयपीओ अप्लाय करावा लागेल. अर्थात एका लॉटमध्ये 90 शेअर्स असतील. याचाच अर्थ गुंतवणूकदाराला किमान 14,850 रुपयांचा आयपीओ विकत घ्यावा लागेल.6 / 11या आयपीओच्या माध्यमाने कंपनीने 702 कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यात 110 कोटी रुपयांच्या नव्या इशूंचाही समावेश असेल. या शिवाय ऑफर फॉर सेलअंतर्गत प्रमोटर्सकडून 3 कोटी 56 लाख 63 हजार 585 पर्यंत शेअर्स विकण्यात येत आहेत.7 / 11आयटी फर्म Happiest Mindsने अँकर्स इंव्हेस्टर्सच्या माध्यमाने 316 कोटी रुपये जमवले आहेत. अँकर्स गुंतवणूकदारांत सिंगापूर सरकार, गोल्डमॅन सॅक्स, कुवेत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, नोमुरा फंड्स आयरलँड, जुपिटर इंडिया आणि पॅसिफिक होरायझन इन्वेस्टमेंट यांचा समावेश आहे.8 / 11Happiest Mindsचे प्रमोटर ममिडकॅप आयटी फर्म माइंडस्पेसचे फाउंडर होते. अशोक सुता यांचा 15 वर्ष विप्रोशी संबंध होता. या कंपनीचा 97 टक्के रेव्हेन्यू डिजिटल विंगने येतो. हा इन्फोसिस, कॉग्निझंट, माइंडट्रीपेक्षा खूप जास्त आहे. या कंपन्यांचे अॅव्हरेज काँट्रीब्यूशन 40 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे.9 / 11विक्री ऑफरमधून येणारे पैसे विक्री शेअरहोल्डर्सना मिळतील. तर फ्रेश इशूच्या विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनी लाँग टर्मसाठी वापरणार आहे. 10 / 11कंपनीला 31 मार्चला संपलेल्या वर्षात 71.70 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झाला होता. तर गेल्या वर्षी हा आकडा 17.36 कोटी रुपये एवढा होता. 11 / 11Happiest Minds Technologies बंगळुरूची IT कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली. या कंपनीचे लक्ष्य IT सुविधा पुरवण्यावर आहे. US, UK, ऑस्ट्रेलिया आणि मिडिल ईस्टमध्ये ही कंपनी आपला व्यवसाय करते. आणखी वाचा Subscribe to Notifications