Happy Birthday Ratan Tata know about the love story of ratan tata why did not he marriage
Happy Birthday Ratan Tata: अब्जाधीश रतन टाटांनी का केलं नाही लग्न? जाणून घ्या, काय होतं 'या' निर्णयामागचं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 3:45 PM1 / 15टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी आयुष्यभर कुणाशीही लग्न केले नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही, की त्यानी कधी कुणावर प्रेमच केले नाही. एका मुलाखतीत स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या लव्ह लाईफसंदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या आयुष्यात एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रेमाने दरवाजा ठोठावला होते. मात्र, कठीण काळात त्यांच्या नात्याची दोर कमकुवत पडली. यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस (Ratan Tata age). जाणून घेऊयात, त्यांच्या लव्ह लाइफसंदर्भातील खास गोष्टी. (Happy Birthday Ratan Tata)2 / 15दिग्गज बिझनेसमन, पण प्रेमात अयशस्वी - दिग्गज बिझनेसमन रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये सुरत येथे झाला. टाटा समुहाचे माजी अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि एक विशेष उंचीही गाठली आहे.3 / 15रतन टाटा यांनी टाटा समुहालाही एका विशेष उंचिवर पोहोचवले. बिझनेसच्या दुनियेत रतन टाटा यांनी मोठे यश मिळवले. मात्र, प्रेमाच्या बाबतीत ते अयशस्वी ठरले.4 / 15प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही - एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या लव्ह लाईफसंदर्भात अनेक खुलासे केले होते. यावेळी, आपणही प्रेमात पडलो होतो, पण आपल्या प्रेमाचे रुपांतर आपण लग्नात करू शकलो नाही, असे ते म्हणाले होते.5 / 15यावेळी टाटा म्हणले होते, दूरचा विचार करता, अविवाहित रहण्याचा आपला निर्णय हा योग्यच ठरला. कारण, लग्न केले असते, तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली असती.6 / 15आपल्या लव्ह लाइफसंदर्भात बोलताना टाटा म्हणाले होते, जर आपण विचाराल, की कधी मी प्रेमात पडलो होतो? तर तुम्हाला सांगतो, की मी चार वेळा गांभीर्याने लग्नासाठी तयार झालो. पण प्रत्येक वेळेला मला काही ना काही कारणाने माघार घ्यावी लागली.7 / 15आपल्या प्रेमाच्या दिवसांसंदर्भात बोलताना टाटा म्हणाले होते, मी जेव्हा अमेरिकेत काम करत होतो, तेव्हा प्रेमाच्या बाबतीत अत्यांत गंभीर झालो होतो. मात्र, मला पुन्हा भारतात यावे लागल्याने आम्हाला लग्न करता आले नाही. 8 / 15रतन टाटा यांच्या प्रेयसीची भारतात येण्याची इच्छा नव्हती - खरे तर, रतन टाटा यांच्या प्रेयसीची भारतात येण्याची इच्छा नव्हती. त्या दरम्यान भारत आणि चीन यांच्यात युद्ध सुरू होते. यानंतर त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच एका व्यक्तीसोबत लग्न केले.9 / 15यावेळी, टाटा यांना एक असाही प्रश्न विचारण्यात आला होता, की ते ज्या मुलीवर प्रेम करत होते, ती अजूनही शहरात आहे? यावर टाटा यांनी केवळ 'हो' असे उत्तर दिले. मात्र, पुढे काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला होता.10 / 15दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. पण, त्यांचे जीवन फारसे सहज नव्हते. कारण रतन टाटा केवळ 7 वर्षांचे असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले. यानंतंर त्यांचा साभाळ त्यांच्या आजीने केला.11 / 15रतन टाटा यांना कारचा प्रचंड छंद आहे. त्यांच्या देखरेखीत टाटा समुहाने, लँड रोव्हर, जगुआर, रेंजरोव्हर अॅक्वायर केल्या. सर्वसामान्यांना टाटा नॅनोचे गिफ्ट देणारेही रतन टाटाच होते. रतन टाटा यांना विमान उडवण्याचा आणि पियानो वाजविण्याचाही छंद आहे.12 / 15आपल्या रिटायरमेंटनंतर टाटा म्हणाले होते, की आता मला माझे छंद पूर्ण करण्याची इच्छा आहे. आता मी पियानो वाजवणार आणि विमान उडवण्याचा माझा छंद पूर्ण करणार.13 / 15 रतन टाटा यांनी सुरुवातीला IBM ची नोकर नाकारली. त्यानंतर एका कर्मचा-याच्या स्वरुपात 1961 मध्ये TATA Steel मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1991मध्ये ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष बनले. 2013 मध्ये रतन टाटा निवृत्त झाले. 14 / 15भारत सरकारने रतन टाटा यांना पद्म भूषण (2000) आणि पद्म विभूषण (2008)ने सन्मानित केले आहे. हे देशातील तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नागरी सन्मान आहेत.15 / 15Happy Birthday रतन टाटा... आणखी वाचा Subscribe to Notifications