शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Harley-Davidson X440: २.२९ लाख, भारतात 'X440' चा धमाका करणाऱ्या हार्ली डेविडसनची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 3:05 PM

1 / 7
ज्या बाईकची तरुण आतुरतेनं वाट पाहत होते, त्यांच्यासाठी हार्ले डेविडसननं एक चांगली बातमी आणली आहे. हार्ली डेविडसननं (Harley-Davidson) आपली सर्वात स्वस्त बाईक आणली आहे.
2 / 7
कंपनीनं आपली Harley-Davidson X440 भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या बाईकची किंमत २.२९ लाख ठेवण्यात आलीये. याशिवाय ही बाईक तुम्हाला कंपनीच्या अधिकृत डिलरकडून खरेदी करता येईल.
3 / 7
ही बाईक बुक करायची असल्यास तुम्हाला २५ हजारांची बुकिंग अमाऊंट भरावी लागेल. कंपनीची ही पहिली अशी बाईक आहे जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलीये. हार्ली डेविडसन आणि हीरो मोटोकॉर्पनं मिळून ही बाईक तयार केलीये.
4 / 7
रिपोर्ट्सनुसार १९०१ मध्ये विलियम एस हार्ली नावाच्या २१ वर्षीय तरुणानं एक फ्लायव्हिल्ससह छोट्या इंजिनचा प्लॅन तयार केला. या इंजिनला एक पॅडल सायकल फ्रेममध्ये वापरण्यासाठी डिझाईन करण्यात आलं होतं.
5 / 7
हार्ली आणि त्याचा लहानपणीचा मित्र आर्थर डेविडसन याचा भाऊ वॉल्टर डेविडसननं मोटर सायकलवर दोन वर्ष मेहनत केली. हे काम १९०३ मध्ये पूर्ण झालं. त्यांनी जी पॉवर सायकल तयार केली ती विना पॅडल मिडवॉकच्या साधारण डोंगरावर चढण्यास सक्षम होती.
6 / 7
यानंतर त्यांनी हायटेक मशीनवर काम सुरू केलं. या पहिल्या हार्ली डेविडसनमध्ये मोठं इंजिन होतं. यासोबतच मशीनची लूप फ्रेम पॅटर्न १९०३ च्या मिलवॉकी मार्केल मोटरसायकल सारखी होती.
7 / 7
आज हार्ली डेविडसन ही जगातील प्रसिद्ध कंपनी आहे आणि फोर्ब्सनुसार २०१८ (मे) मध्ये याचं मार्केट कॅप सात अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचले. भारतात या कंपनीनं नुकतीच १७ मॉडेल्स सादर केली. याची किंमत ५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत आहे. या कंपनीच्या बाईक्स सुपर बाईक्स म्हणून ओळखल्या जातात.
टॅग्स :businessव्यवसायHarley-Davidsonहार्ले डेव्हिडसनbikeबाईक