Harley Davidson's 'shutdown' in India, employees unemployed
हार्ले डेविडसनचं 'भारतात शटडाऊन', कर्मचारी बेकार By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 7:39 PM1 / 11 भारतातील हार्ले डेविडसन कंपनीच्या बाईक खरेदीदारांसाठी निराशाजनक बातमी आहे. कंपनीने भारतातील आपला उद्योग बंद केला आहे. 2 / 11 कंपनीने The Rewire प्रोग्रामअंतर्गत भारतातील उत्पादन आणि सेल्स कॉर्पोरेशन पूर्णपणे बंद केले आहे. 3 / 11 हरियाणातील शहर बावल येथील उत्पादन कंपनीने आजपासून बंद केले आहे. 4 / 11 भारतात गेल्या 10 वर्षात कंपनीने मोटारसायकल्सचे एकूण 30,000 युनिट्स विकले आहेत. 5 / 11 गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने केवळ 2,500 दुचाकी गाड्यांची विक्री भारतात केली आहे. 6 / 11 भारतीय बाजारात कंपनीचा नफा अतिशय कमी होत होता, त्यामुळे नुकसानीत जाण्यापूर्वीच कंपनीने हा निर्णय घेतला आहे7 / 11 हार्ले डेविडसन कंपनीकडून लवकरच भारतातील एका दुचाकी कंपनीसोबत पार्टनरशीप करण्यात येऊ शकते.8 / 11 हिरो मोटरकॉर्प कंपनीसोबत लवकरच हार्ले डेविडसनची भागिदारी होईल, अशी सुत्रांची व तज्ज्ञांची माहिती आहे. 9 / 11 कंपनीने भारतातील उत्पादन बंद केले असले तरी, देशातील ग्राहकांसाठी सेवा सुरूच राहणार असल्याचे कंपनीने म्हटलंय. 10 / 11 कंपनीकडून बिझनेस मॉडेल बदलण्यात येत आहे, त्यामुळे केवळ दुचाकी गाड्यांचं उत्पादन बंद करण्यात आल्याचं कंपनीने अधिकृतपणे सांगितलं आहे.11 / 11 हरयाणातील बवालमध्ये या कंपनीचं अॅस्मेबली युनिट आहे. जवळपास 70 कर्मचारी आता बेरोजगार होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications