शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर बाजारात आपल्यालाही बसला फटका? या 9 योजनांमध्ये पैसा लावा, व्हाल मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 10:09 AM

1 / 8
निवडणूक निकालाच्या दिवशी अर्थात 4 जूनला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात जवळपास 45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोरोना महामारीनंतरच्या 4 वर्षातली ही सर्वात मोठी घसरण होती. जवळपास सर्वच गुंतवणूकदारांना याचा फटका बसला.
2 / 8
अशा स्थितीत आपली कुठल्याही रिस्क शिवाय नफा मिळविण्याची इच्छा असेल, तर या सरकारी योजना आपल्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.
3 / 8
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. याशिवाय टॅक्‍समध्ये सूट आणि इतर गोष्टींचीही सुविधा मिळते. विशेष म्हणजे अधिक परतव्यासह. तर जाणून घेऊयात या खास योजनांसंदर्भात...
4 / 8
सरकारने 30 जूनला संपणाऱ्या तिमाहीसाठी सर्वच स्‍मॉल सेव्हिंग स्‍कीमचे व्याजदर कायम ठेवले आहेत. अर्थमंत्रालयाने 1 एप्रिल ते 30 जून 2024 पर्यंतच्या तिमाहीसाठी पोस्‍ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या महिला सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्‍या समृद्धि योजना, PPF, SCSS, Time Deposit, MIS, NSC आणि KVP, या योजनांच्या व्याजदरात बदल केलेला नाही.
5 / 8
कोणत्या योजनेत किती व्यात? - पीपीएफमध्ये वर्षाला 7.1% एवढे व्याज दिले जाते. यात 500 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यास टॅक्समध्येही सूट मिळते. सीनियर सिटीझन सेव्हिंग स्‍कीममध्ये 8.2% एवढे व्याज मिळते. या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत एकगठ्ठा रक्कम जमा करू शकता.
6 / 8
पोस्‍ट ऑफिस टाइम डिपॉजिट योजनेत 3 वर्षांसाठी 7.1% तर पाच वर्षांसाठी 7.5% एवढे व्याज मिळते. यांपैकी, 5 वर्षांचे टाइम डिपॉझिट केल्यास टॅक्‍समध्येही सूट मिळते. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक करण्याला कसल्याही प्रकारची मर्यादा नाही.
7 / 8
मंथली इनकम स्‍कीममध्ये आपल्याला 7.4% एवढा परतावा मिळतो. यात 9 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करू शकता. NSC मध्ये 7.7% चा कंपाउंडिंग रिटर्न मिळतो. महत्वाचे म्हणजे, या योजनेतही टॅक्स बेनिफिट मिळतो.
8 / 8
किसान विकास पत्रमध्ये 7.5 टक्के व्याज मिळते. महिला सेव्हिंग सर्टिफिकेटमध्येही 7.5% व्याज मिळते. ही योजना केवळ 2 वर्षांसाठीच आहे. तसेच, सुकन्‍या समृद्धी योजनेत 8.2% एवढे व्याज मिळते.
टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारPost Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसा