शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

HDFC बँकेची कमाल कामगिरी! कमावला १० हजार कोटींचा नफा; कर्ज वितरणात १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 7:19 PM

1 / 9
आताच्या घडीला विविध क्षेत्रातील कंपन्या आपले गत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील कामगिरीचे आकडे जाहीर करत आहे. आयटी क्षेत्रातील टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांची आकडेवारी समोर आल्यानंतर आता बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या HDFC ने आपली आकडेवारी जाहीर केली आहे.
2 / 9
खासगी क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या HDFC बँकेला ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत १० हजार कोटींचा नफा झाला आहे. यंदा नफ्यात २३ टक्के वाढ झाली. एचडीएफसी बँकेने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
3 / 9
HDFC बँकेला जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत १०,०५५.२ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ८,१८५.५१ कोटींचा नफा झाला होता. यंदा नफ्यात २३ टक्के वाढ झाली.
4 / 9
HDFC बँकेला व्याजातून १८,८७२.७ कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. बँकेच्या कर्ज वितरणात २२०.९ टक्के वृद्धी झाली आहे. तर किरकोळ कर्ज वितरण १५ टक्क्यांनी वाढले असल्याचे बँकेने म्हटले आहे.
5 / 9
HDFC बँकेच्या ठेवींमध्ये १६.८ टक्के वृद्धी झाली असून हा आकडा १५.५९ लाख कोटींवर गेला आहे. त्याशिवाय किरकोळ ठेवीमध्ये देखील १८.५ टक्के वाढ झाली आहे.
6 / 9
HDFC बँकेच्या घाऊक ठेवींमध्ये १० टक्के वृद्धिदर नोंदवण्यात आला असल्याचे बँकेच्या आकडेवारीतून दिसून येते. चौथ्या तिमाहीत बँकेने ५६३ नवीन शाखा सुरु केले. यामुळे ३१ मार्च २०२२ अखेर बँकेच्या एकूण शाखांची संख्या ६,३४२ वर गेली आहे.
7 / 9
एचडीएफसी बँकेत एचडीएफसी या कंपनीचे विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. एचडीएफसीच्या संचालक मंडळाने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी भागधारकांना २५ शेअरच्या तुलनेत एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर मिळणार आहेत.
8 / 9
शेअर बाजारात मागील काही सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअरवर दबाव दिसून आला आहे. एनएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर १,४६४.९५ रुपयांवर बंद झाला होता. त्यात १.९१ टक्के घसरण झाली होती.
9 / 9
दरम्यान, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे आता एचडीएफसी बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. HDFC च्या उपकंपनी असलेल्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येणार आहेत.
टॅग्स :hdfc bankएचडीएफसी