शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँका जोमात, ग्राहक कोमात! आता ‘या’ ५ बँकांनी कर्जदर वाढवले; EMI चा बोजा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 5:22 PM

1 / 12
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पतधोरण जाहीर करताना रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ केली होती. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीनंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.
2 / 12
ICICI बँकेनंतर आता अनेक बँकांनी आपले कर्जदर वाढवण्यास सुरुवात केली असून, ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण विविध प्रकारच्या कर्जाचे हफ्ते यामुळे वाढणार आहेत.
3 / 12
रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दरात ५० बीपीएसने वाढ करण्याच्या निर्णयाला प्रतिसाद देत, अनेक बँका आणि वित्त संस्थांनी बाह्य घटकांशी संबंधित गृहकर्ज दर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँकेद्वारे रेपो दरात वाढ केल्यानंतर ५ मोठ्या बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे.
4 / 12
तत्पूर्वी, आयसीआयसीआय बँकेने १ जून २०२२ रोजी एमसीएलआरवर आधारित कर्जाचे सुधारित व्याजदर जाहीर केले होते. आता आठवडाभरात दुसऱ्यांदा बँकेने कर्जदर वाढवल्याने सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जांच्या मासिक हप्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
5 / 12
HDFC बँकेने कर्जदर वाढवले - तारण कर्जदार एचडीएफसीने १० जूनपासून गृहकर्जावरील किरकोळ प्राइम लेंडिंग रेट (आरपीएलआर) ५० बेसिस पॉइंट्सने वाढवले आहेत. त्यासोबत, एचडीएफसी गृहकर्ज ईएमआय वाढणार आहे. नियामक फाइलिंगमध्ये, सावकाराने म्हटले आहे की, हाउसिंग लोनवर रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवत आहे, ज्यावर त्याचे एआरएचएल बेंचमार्क केले जाते, ५० बेस पॉइंट्सने, १० जून २०२२ पासून लागू झाले.
6 / 12
सध्या, त्याच्या वेबसाइटवर, आरपीएलआर शी जोडलेले कर्ज स्लॅब ७.०५ टक्के ते ७.५५ टक्क्यांपर्यंत आहे. कर्जाचा स्लॅब १० जूनपासून बदलणार आहे. १० जूनपासून, एचडीएफसीनुसार, ८०० पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअरवरील व्याज दर सध्या आकारल्या जाणाऱ्या ७.०५ टक्के वरून ७.५५ टक्के असेल.
7 / 12
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपला रेपो आधारित कर्ज दर बदलला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर सुधारित केल्‍याच दिवशी ही घोषणा झाली. बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, आता त्याचे प्रभावी आरबीएलआर ७.७५ टक्के झाले आहे. याचा अर्थ ४.९० टक्के रेपो दराने त्याचा मार्कअप २.६५ टक्के आहे. नवीन दर बुधवार, ८ जूनपासून लागू झाले आहेत.
8 / 12
दिल्ली-मुख्यालय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेनेही त्यांच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने ८ जून रोजी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आणि पंजाब नॅशनल बँकेने ९ जून रोजी व्याजदरात वाढ केली. आता PNB चा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ७.४० टक्के आहे. ९ जून २०२२ पासून नवे व्याजदर लागू झाले.
9 / 12
सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट सुधारित केला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, आता बँक ऑफ बडोदाचा किरकोळ कर्जाशी संबंधित विविध कर्जावरील व्याजदर ७.४० टक्के असेल. रिझर्व्ह बँकेच्या ४.९० टक्के रेपो दरावर बँकेचा मार्कअप २.५० टक्के आहे.
10 / 12
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने (आयओबी) रेपो दर आधारित व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेने रेपो आधारित व्याजदरात ०.५० टक्के वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरातही अशीच वाढ केली आहे.
11 / 12
इंडियन ओव्हरसीज बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ७.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ही वाढ १० जून २०२२ पासून लागू होणार आहे.
12 / 12
रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता ४.९० टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. या व्याजदर वाढीने गृह कर्जासह सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाhdfc bankएचडीएफसीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक