hdfc hikes home loan rates by 25 basis points from 1st march 2023
HDFC बँक ग्राहकांना देणार झटका! १ मार्चपासून लागू होणार 'हा' निर्णय, खिशावर होणार परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 7:56 PM1 / 8HDFC बँक आपल्या ग्राहकांना झटका देणार आहे. आत गृहकर्ज EMI महाग झाला आहे. गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC ने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 2 / 8गृहकर्ज HDFC लिमिटेडने आपल्या कर्जदरात २५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहकर्ज दरातील वाढ १ मार्च २०२३ पासून लागू होईल.3 / 8HDFC ने 9व्यांदा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. HDFC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, HDFC ने गृहकर्जावर रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.4 / 8अॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) मध्ये ३२५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे, जी १ मार्च २०२३ पासून लागू होईल. यामुळे आता एचडीएफसीचे गृहकर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक ईएमआय भरावा लागेल.5 / 8तसेच ज्यांनी गृहनिर्माण वित्त कंपनीकडून गृहकर्ज घेतले आहे, त्यांची ईएमआय महाग होईल. एचडीएफसीच्या दरवाढीच्या घोषणेनंतर गृहकर्जाचे व्याजदर ९.२५ टक्क्यांनी सुरू होतील. ज्या ग्राहकांचा CIBIL क्रेडिट स्कोअर ७६० पेक्षा जास्त आहे, त्यांना बँक विशेष ऑफर अंतर्गत ८.७० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.6 / 8२० वर्षांसाठी २० लाख रुपयांच्या गृहकर्जावर ९ टक्के व्याजदराने, ईएमआय १७,९९५ रुपये भरावा लागणार होता. पण गृहकर्जाचा दर ९.२५ टक्के झाल्यानंतर EMI १८,३१७ रुपये होईल.7 / 8१५ वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेण्यासाठी ३०४२८ रुपयांचा ईएमआय ९% दराने भरावा लागेल. परंतु HDFC चे व्याजदर वाढवल्यानंतर नवीन दर ९.२५ टक्के होतील आणि त्यावर ३०,८७६ रुपये EMI भरावा लागेल.8 / 8१५ वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेण्यासाठी ३०४२८ रुपयांचा ईएमआय ९% दराने भरावा लागेल. परंतु HDFC चे व्याजदर वाढवल्यानंतर नवीन दर ९.२५ टक्के होतील आणि त्यावर ३०,८७६ रुपये EMI भरावा लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications