hdfc increased rates savings fixed deposits fd home loan company corporate good return
HDFC नं वाढवले FD वरील व्याजदर; मिळणार चांगले रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 1:32 PM1 / 10होम लोन देणारी कंपनी HDFC लिमिटेडनं आपल्या बँकेत ठेवण्यात येणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे.2 / 10एच़डीएफसी लिमिडेटनं आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवे व्याजदर ३० मार्च पासून लागू करण्यात आले आहेत.3 / 10एकीकडे काही बँका आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र एचडीएफसी बँकेनं हे व्याजदर वाढवले आहेत. 4 / 10एचडीएफसीनं दिलेल्या माहितीनुसार ३३ महिन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या २ कोटी रूपयांपर्यंतच्या एफडीवर वर्षाला ६.२० टक्के व्याज मिळणार आहे.5 / 10तर ६६ महिन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर ६.६० टक्के आणि ९९ महिन्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ६.६५ टक्के व्याज देण्यात येईल.6 / 10याबाबत एक प्रमुख बाब म्हणजे हे व्याजदर एचडीएफसी बँकेचे नसून होम लोन देणारी कंपनी एचडीएफसी लिमिटेडच्या एफडीसाठी आहे. या एफडी कॉर्पोरेट एफडीच्या श्रेणीत येतात. 7 / 10कॉर्पोरेट एफडीवर रिटर्न चांगले मिळतात. परंतु बँकांच्या तुलनेत यात जोखीम अधिक पत्करावी लागते. 8 / 10एचडीएफसीकडे गेल्या २५ वर्षांपासून क्रिसिल आणि आयसीआरए दोन्हीची AAA रेटिंग आहे. 9 / 10या एफडीची निवड करण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक असे पर्यायही मिळतात.10 / 10कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट डीआयसीजीसी विमाद्वारे कव्हर केले जात नाहीत. परंतु बँक एफडीमध्ये पाच लाखांपर्यंत विमा कव्हर मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications