शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

HDFC Twin Merger: HDFC चं होणार विलिनीकरण, तुमचं खातं या बँकेत असेल तर जाणून घ्या काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 7:12 PM

1 / 8
भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली HDFC आणि सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC लिमिटेड यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या स्वतंत्र बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. आता काही नियामक मंजूरी मिळताच हे दोघांचं विलिनीकरण होईल.
2 / 8
अशा परिस्थितीत या विलीनीकरणामुळे बँक खातेधारकांवर काय परिणाम होणार आहे, असा प्रश्न सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. या डीलमुळे HDFC बँक खातेधारकांवर कसा परिणाम होईल ते जाणून घेणं महत्वाचं बनलं आहे.
3 / 8
विलिनीकरणाच्या डील अंतर्गत HDFC लिमिटेडच्या भागधारकांना HDFC बँकेचे २५ शेअर्ससाठी प्रत्येकी २ रुपये फेस व्हॅल्यू असलेले ४२ शेअर्स मिळतील, ज्यांची फेस व्हॅल्यू १ रुपये असेल. विलीनीकरणानंतर, HDFC बँक १००% सार्वजनिक भागधारक कंपनी बनेल.
4 / 8
विलीनीकरणानंतर, HDFC लिमिटेडची HDFC बँकेत ४१ टक्के भागीदारी असेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, HDFC बँक रेकॉर्ड तारखेला HDFC Ltd च्या भागधारकांना इक्विटी शेअर्स जारी करेल.
5 / 8
विलीनीकरणाच्या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एचडीएफसी लिमिटेडच्या सर्व उपकंपन्या आणि सहयोगी एचडीएफसी बँकेचा भाग बनतील. यामुळे एचडीएफसी बँकेला तात्काळ फायदा होईल आणि असुरक्षित कर्जांमधील एक्सपोजरचा हिस्सा कमी होईल.
6 / 8
विलीनीकरणानंतर, HDFC बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांना आता एकाच छताखाली अतिरिक्त सेवा मिळतील, ज्या HDFC Ltd च्या पोर्टफोलिओचा भाग आहेत. यापैकी, मोर्टगेज प्रोडक्ट (तारण उत्पादन) सर्वात महत्वाचे आहेत.
7 / 8
या करारांतर्गत एचडीएफसी लिमिटेडचे ​​एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार असल्याने, खातेधारकांच्या कागदपत्रांवर किंवा बँकेच्या भागधारकांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
8 / 8
बँकेच्या ग्राहकांना आधीच उपलब्ध असलेल्या सर्व सेवा तर मिळतीलच पण आता काही नवीन सेवाही उपलब्ध होणार आहेत. दुसरीकडे, एचडीएफसी लिमिटेडचे ​​सर्व ग्राहक आता थेट एचडीएफसी बँकेचा भाग बनतील.
टॅग्स :hdfc bankएचडीएफसीbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र