शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 8:30 AM

1 / 8
रवी जयपुरिया यांचा जन्म १९५३ मध्ये झाला. ३ भावांमध्ये ते सर्वात लहान होते. १९८७ मध्ये कुटुंबाचे विभाजन झालं आणि रवी जयपुरिया यांना बॉटलिंग प्लांट मिळाला. विभाजनापूर्वी त्यांचं कुटुंब बॉटलिंगचं काम करायचं.
2 / 8
बॉटलिंग म्हणजे कंपनीची पेये बाटल्यांमध्ये पॅक करणं. रवी यांनी पेप्सिकोला मिळालेल्या बॉटलिंग प्लांटमध्ये काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांची गाडी इतक्या वेगानं रुळावर आली की आज भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
3 / 8
रवी जयपुरिया यांची आजची संपत्ती ११.६ अब्ज डॉलर आहे. भारतीय चलनात हे ९५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते भारतातील १८ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील अब्जाधीशांमध्ये त्यांचा क्रमांक २३२ वा आहे. वरुण बेव्हरेजेस असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. त्यांची आणखी एक कंपनी आहे ज्याच्या अंतर्गत अनेक आंतरराष्ट्रीय फूड ब्रँड भारतात काम करतात.
4 / 8
रवी जयपुरिया यांच्या दुसऱ्या कंपनीचं नाव देवयानी इंटरनॅशनल आहे. ही कंपनी भारतात KFC, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफीचा व्यवसाय चालवते. रवी जयपुरिया येथूनही चांगली कमाई करतात.
5 / 8
वरुण बेव्हरेज आणि देवयानी इंटरनॅशनल या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. वरुण बेव्हरेजेस २०१६ मध्ये आणि देवयानी इंटरनॅशनल २०२१ मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाल्या.
6 / 8
रवी जयपुरिया यांची हॉटेल चेन लेमन ट्रीमध्येही भागीदारी आहे. पण त्यांच्याकडे फार कमी भागीदारी आहे. याशिवाय मेदांता या हेल्थकेअर ब्रँडमध्येही रवी यांची भागीदारी आहे. रवी जयपुरियाचा व्यवसाय मोरोक्को, श्रीलंका, झांबिया, मोझांबिक आणि नेपाळमध्येही पसरलेला आहे.
7 / 8
रवी जयपुरिया यांच्या दोन्ही कंपन्या त्यांच्या मुलांच्या नावावर आहेत. त्यांच्या मुलीचं नाव देवयानी आणि मुलाचं नाव वरुण आहे. १९८५ मध्ये रवी जयपुरिया यांच्या पत्नीचं विमान अपघातात निधन झालं.
8 / 8
रवी जयपुरिया हे फोर्ब्सच्या टॉप १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत कायम आहेत. २०२२ मध्ये त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. २०१४ पासून त्यांची एकूण संपत्ती सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये, त्यांची एकूण संपत्ती १.५ अब्ज डॉलर्स होती, जी आता ११ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीbusinessव्यवसाय