शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ChatGPT मागचे डोके! भारतीय वंशाची मीरा ओपनएआयची नवी अंतरिम सीईओ; कोण आहे ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 9:37 AM

1 / 8
चॅट जीपीटीमध्ये आज मोठे वादळ आले आहे. कंपनीने आपल्याच सीईओला नोकरीवरून काढून टाकले आहे. तसेच ओपन एआय बोर्डाच्या अध्यक्षानेही राजीनामा दिला आहे. धक्कादायक म्हणजे या लोकांनी मिळूनच आपल्या राहत्या घरात काम करत ही कंपनी स्थापन केली होती. यापैकी दोघांना ही कंपनीच सोडावी लागली आहे. तर भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे अंतरिम सीईओ पद देण्यात आले आहे.
2 / 8
मीरा मुराती असे या भारतीय वंशाच्या महिलेचे नाव असून तिचे वय अवघे ३४ वर्षे आहे. त्या कंपनीच्या सीटीओ आहेत. आता त्यांच्यावर नवीन सीईओ मिळत नाही तोवर ओपन एआयच्या सीईओपदाची धुरा सांभाळायची जबाबदारी देण्यात आली आहे.
3 / 8
OpenAI चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील बोर्डाचे अध्यक्षपद सोडले आहे. गेल्यावर्षी चॅट जीपीटी लाँच झाले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. करो़डो नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली होती.
4 / 8
कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम त्यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट नव्हता. यामुळे बोर्डाला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडथळा आला. बोर्डाला आता ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, असे ओपन एआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
5 / 8
आता ऑल्टमॅनच्या जागी नियुक्त झालेल्या कोण आहेत या मीरा मुराती? जाणून घेऊया...
6 / 8
OpenAI च्या ChatGPT आणि DALL-E सारख्या क्रांतिकारी उत्पादनांच्या विकासामागे मीरा मुराती यांची कल्पना असल्याचे सांगितले जाते. मुरती यांचा जन्म अल्बेनियामध्ये झाला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या पीअरसन कॉलेज यूडब्ल्यूसीमध्ये शिकण्यासाठी कॅनडाला गेल्या. अमेरिकेतील आयव्ही लीग डार्टमाउथ कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतले.
7 / 8
मीरा यांनी गोल्डमॅन सॅक्स आणि नंतर झोडियाक एरोस्पेसमध्ये इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली. तीन वर्षे त्या टेस्लामध्ये देखील कार्यरत होत्या.
8 / 8
ओपनएआयमध्ये अप्लाइड एआय आणि पार्टनरशीपच्या व्हाईस प्रेसिडंट म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. २०१८ मध्ये तिने सुपरकॉम्प्युटिंगवर काम करण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये तिला ओपन एआयमध्येच चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून बढती मिळाली.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स