शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 1:32 PM

1 / 8
अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या एका रिसर्च रिपोर्टने अदानी उद्योग समुहाची डोकेदुखी वाढवली आहेत. तसेच हे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात भारतीय शेअर बाजारामध्येही खळबळ उडाली आहे. अदानी समुहाच्या विविध कंपन्यांच्या शेअरच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्याने गौतम अदानी सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. एका माहितीनुसार अदानींचे ४ लाख १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
2 / 8
हिंडेनबर्गच्या रिपोटमध्ये जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यर्तीने कॉर्पोरेट इंडस्ट्रीत कशाप्रकारे फसवणूक घडवून आणली, त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अदानी समुहाने कंपनींची मार्केट व्हॅल्यू मॅनिप्युलेट केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चमधून अदानी समुहावर लावण्यात आलेले आरोप पुढील प्रमाणे आहेत.
3 / 8
पहिला आरोप - अदानी समुहातील कंपन्यांनी शेअर्सची किंमत मॅनिप्युलेट केली आणि अकाऊंटिंग फ्रॉड घडवून आणले.
4 / 8
दुसरा आरोप - अदानी समुहाने परदेशात अनेक कंपन्या बनवून टॅक्स वाचवण्याचं काम केलं.
5 / 8
तिसरा आरोप - टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या मॉरिशस आणि कॅरेबियन देशांमध्ये अनेक बेनामी कंपन्या आहेत. त्यांची अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.
6 / 8
चौथा आरोप - अदानींच्या लिस्टेड कंपन्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. त्यामुळे अदानी समूह अस्थिर वित्तीय स्थितीमध्ये आहे.
7 / 8
पाचवा आरोप - अधिकच्या मूल्यांकनामुळे कंपन्यांच्या शेअर्सची किंमत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
8 / 8
हिंडेनबर्गचा हा रिपोर्ट समोर येताच पहिल्या दोन दिवसांमध्येच अदानी ग्रुपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातील तीन ठळक परिणाम म्हणजे अदानी समुहाच्या मार्केट कॅपिटलायझेशनमधील ४ लाख १० हजार कोटी रुपये कमी झाले आहेत. अदानी एंटरप्रायझेर लिमिटेडच्या शुक्रवारी आलेल्या २० हजार कोटींच्या एफपीओला पहिल्या दिवशी केवळ १ टक्का सब्स्क्राइब मिळाले आहेत. तर श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकवरून सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीStock Marketशेअर बाजारbusinessव्यवसाय