Hero MotoCorp Partners Taiwans Gogoro to Launch Electric Scooters, Battery Swapping Stations India
Hero MotoCorp भारतात लाँच करणार नवी Electric Scooter, bike; तैवानच्या कंपनीसोबत केला करार By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 4:58 PM1 / 15जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक गाड्यांचा समावेश आहे. 2 / 15कंपनीकडे स्मॉल कॅपॅसिटी बाईक्स, ADVs देखील आहे. परंतु सध्या मोठी मागणी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनं मात्र कंपनीकडे नाहीत.3 / 15याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबात झालेल्या करारांतर्गत हीरो इलेक्ट्रिक्स केवळ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करतं. तर हिरो मोटोकॉर्पकडे ICE वाहन आहेत.4 / 15सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता हीरो मोटोकॉर्पनंदेखील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.5 / 15कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये तैवानची कंपनी Gogoro च्या मदतीनं उतरणार आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार हीरो या ब्रान्डच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केल्या जातील.6 / 15Gogoro च्या बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा कंपनीला सपोर्ट मइळणार आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकल, स्कूटर Gogoro चं तंत्रज्ञान वापरणार आहे. 7 / 15तसंच या मोटरसायकलचं आणि स्कूटरचं मार्केटिंग हे हीरो मोटोकॉर्पद्वारे केलं जाईल. हीरो मोटोकॉर्पेकडे भारतातील सर्वात मोठ्या डिस्ट्रिब्युशन मार्केटपैकी एक मार्केट आहे. 8 / 15कंपनीनं यापूर्वी प्रीमिअम वाहनांची निर्मिती करणाऱ्या Erik Buell सोबत पार्टनरशिप केली होती. परंतु बाजारात त्यांची अधिक उत्पादनं आली नाही.9 / 15मिळालेल्या माहितीनुसार Gogoro ही कंपनी भारतात बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजसाठी पायाभरणी करणार आहे. यानंतर हीरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक वाहनं लाँच करू शकते. 10 / 15Gogoro ही कंपनीदेखील स्वत:च्या ईलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर तयार करते. हीरो मोटोकॉर्प Gogoro च्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे.11 / 15परंतु कंपनी भारतीय बाजारपेठेनुसार स्वत:च्या स्कूटर डिझाईन करेल. बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीस एक ग्राहक कोणत्याही सेंटरवर जाऊ शकतो. 12 / 15अॅपचा वापरही ग्राहकांना करता येतो. केवळ संपलेल्या बॅटरीच्या बदल्यात ग्राहकांना काही मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज झालेली बॅटरीही मिळू शकते. 13 / 15सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत हीरो मोटोकॉर्पनं आपले सर्व प्रकल्प १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 14 / 15दरम्यान, या कालावधीत उत्पादन बंद असलं तरी आवश्यक ते मेन्टेनन्सचं काम केलं जाणार असल्याचं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं. 15 / 15२२ एप्रिल ते १ मे दरम्यान सर्व प्रकल्प आणि जीपीसी टप्प्याटप्प्यानं चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications