'Hidden Charge' of Credit Cards, Bankers Never Tell; Know, or else…
क्रेडिट कार्डचे 'हिडन चार्ज', बँकर्स कधीच सांगत नाहीत; जाणून घ्या, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 2:58 PM1 / 6नवी दिल्ली : देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा (Credit Card) कल वाढला आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला तर ते पैसे वाचवण्यास उपयुक्त ठरतात. मात्र, या क्रेडिट कार्डांशी संबंधित काही शुल्क आहेत, जे खूप जास्त असतात. सहसा बँकर्स हे सांगत नाहीत. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी या शुल्कांची जाणीव ठेवली पाहिजे.2 / 6क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे याला कॅश अॅडव्हान्स म्हणतात. अनेक वेळा घाईगडबडीत डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डमधूनही पैसे काढण्याची चूक होते. क्रेडिट कार्ड कंपन्या युजर्सना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची परवानगी देतात, परंतु व्याज जास्त आहे. कॅश अॅडव्हान्सवर इंटररेस्ट फ्री क्रेडिट कालावधीचा कोणताही फायदा मिळत नाही. म्हणजेच खरेदी केल्यानंतर मिळणारा व्याजमुक्त वाढीव कालावधी त्यात मिळत नाही. अशाप्रकारे क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे तुमच्या खिशाला भारी पडू शकते.3 / 6देय तारखेपर्यंत किमान पैसे दिले जात नाहीत, तेव्हा तुमच्या थकबाकीवर लेट पेमेंट शुल्क आकारले जाते. बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या सामान्यतः थकीत रकमेवर आधारित लेट पेमेंट आकारतात. बिलाची रक्कम जितकी जास्त असेल तितके लेट पेमेंट असेल.4 / 6अॅन्युअल मेंटनेंस फी म्हणजेच वार्षिक देखभाल शुल्क हे शुल्क आहे, जे तुम्ही तुमचे खाते मेंटेन करण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या घेतात. हे शुल्क वर्षातून एकदा घेतले जाते. हे शुल्क वेगवेगळ्या कार्डांवर बदलते. अनेक कार्ड कंपन्या क्रेडिट कार्डवर कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क आकारत नाहीत.5 / 6जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट रोखीने करता तेव्हा सामान्यत: कॅश प्रोसेसिंग फी आकारली जाते. बँका तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नेट बँकिंग, चेक पेमेंट आणि मोबाईल बँकिंग यासारख्या इतर पद्धतींद्वारे पेमेंट करण्याची परवानगी देतात.6 / 6क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट देण्याचा उद्देश ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी बँक विविध सुविधा देते. एकदा तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्स जमा केले की, तुम्ही बँकेने देऊ केलेल्या सोयीनुसार ते रिडीम करू शकता. परंतु बक्षिसे परत करण्यासाठी अनेकांकडून शुल्क आकारले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications