शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hindenburg Impact : हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम? LIC चे ८ दिवसांत बुडाले ६५,४०० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 4:14 PM

1 / 7
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्येही गुरुवारी घसरण झाल्याचे दिसून आले. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहाबाबत खुलासा झाल्यानंतर सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्येही सातत्याने घसरण होत आहे.
2 / 7
एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 65,400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारपर्यंत कंपनीचे बाजारमूल्य 4,44,141 कोटी रुपयांवरून 3,78,740 रुपयांवर घसरले होते. कंपनीच्या शेअरमध्ये पाच दिवसांत 14.73 टक्क्यांची घसरण झाली आहे.
3 / 7
गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून यात घसरण झाल्याचं दिसूय येतंय. यामागे काय कारण आहे ते नक्की समजून घ्यायला हवं.
4 / 7
अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहाने गेल्या काही दशकांमध्ये शेअर बाजारातील फेरफार आणि अकाउंटिंगशी संबंधित फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अदानी समूहाने हा दावा खोटा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
5 / 7
आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स घसरले आहेत का? एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण काय आहे. याचे कारण म्हणजे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील एलआयसीची हिस्सा.
6 / 7
सध्या, अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमध्ये LIC चा 4.23 टक्के हिस्सा आहे. तर दुसरीकडे एलआयसीचा अदानी पोर्ट्समध्ये 9.14 टक्के आणि अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के हिस्सा आहे. अलीकड्याच शेअर सेलमध्ये एलआयसी ही मोठी गुंतवणूकदार कंपनीही होती.
7 / 7
दरम्यान, आपण अदानी समूहाच्या व्यवस्थापनाकडून शॉर्ट सेलिंग फर्मच्या रिपोर्टवर स्पष्टीकरण मागितल्याचं एलआयसीनं म्हटलेय. दुसरीकडे समूहातील कंपनीतील गुंतवणूकीवर उत्तम नफा मिळाल्याचेही एलआयसीने निवदेनाद्वारे सांगितले आहे. कंपनीचे स्टॉक्स आणि बाँड गुंतवणूकवर जवळपास 100 टक्के फायदा झाला आहे. तर अदानी समूहाच्या शेअर्स आणि बाँडमध्ये फार कमी गुंतवणूक असल्याचेही एलआयसीने म्हटलेय.
टॅग्स :AdaniअदानीLIC - Life Insurance Corporationएलआयसीshare marketशेअर बाजार