शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिंडेनबर्गमुळे झटका, पुन्हा दमदार सुरुवात; अदानींनी करुन दाखवलं, मार्केट कॅप ₹१४००००० कोटींपार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 8:51 AM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बुधवारी देखील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली. अदानी समूहाच्या शेअर्सने रॉकेटचा स्पीड पकडलाय. इतकंच नाही तर कंपन्यांचं मार्केट कॅप १४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.
2 / 10
अदानी समूहावर हिंडेनबर्गनं केलेले आरोप तथ्यहिन असल्याचा अहवाल समोर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा समूहाच्या शेअर्सनं वेग पकडला. अमेरिकन सरकारच्या संस्थेनं अदानी समूहाला क्लीन चिट दिली आणि हिंडेनबर्गचे आरोप निरर्थक असल्याचं म्हटले. हा अहवाल आल्यानंतरच अदानींच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. २४ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांनंतर, समूहाने आता जबरदस्त पुनरागमन केलंय.
3 / 10
२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गनं अहवाल प्रसिद्ध करत अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप केला. कंपनीवर हेराफेरी, खात्यांमध्ये फेरफार, शेअर्सची जास्त किंमत असे गंभीर आरोप केले. हिंडेनबर्गच्या या आरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं. गुंतवणूकदार आणि भागधारकांचा अदानीवरील विश्वास उडू लागला.
4 / 10
गुंतवणूकदार कंपनीकडे पाठ फिरवू लागले. गुंतवणूकदार आणि भागधारकांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. कंपनीचे शेअर्स कोसळले. कंपनीचं मार्केट कॅप निम्म्याहून अधिक घसरलं. कंपनीची अर्ध्याहून अधिक कमाई बुडाली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे ३० व्या स्थानापेक्षाही खाली घसरले.
5 / 10
हिंडेनबर्गच्या आरोपानंतर रस्त्यांवरून संसदेपर्यंत गदारोळ झाला. यानंतर तपासावर तपास सुरू झाला. सर्व तपास यंत्रणा अदानीच्या मागे लागल्या. मात्र, सर्व अडचणींमध्येही गौतम अदानी यांनी संयम सोडला नाही. कठीण परिस्थितीत त्यांनी कंपनीला उत्तमरित्या सांभाळलं.
6 / 10
आपल्या कर्मचाऱ्यांचा तसंच गुंतवणूकदार आणि भागधारकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदारांची मनं आणि विश्वास जिंकण्यासाठी, गौतम अदानी यांनी त्यांच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला.
7 / 10
त्यांचा एफपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाला होता. त्यानंतरही गुंतवणूकदारांचं हित पाहता त्यांनी तो मागे घेण्याचा निर्णय घेतला. गौतम अदानींच्या या कृतीचं कौतुकही करण्यात आलं. त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परदेशातही जाऊन त्यांनी कंपनीबाबतचं सत्य सर्वांसमोर मांडलं.
8 / 10
हिंडेनबर्गनं आपल्या अंजेंड्यासाठी हे सर्व आरोप केल्याचं त्यांनी सातत्यानं म्हटलं. याशिवाय अदानींनी तपासात सहकार्यही केलं. याचाच परिणाम म्हणून वर्षभरात त्यांनी पुन्हा एकदा आपलं स्थान परत मिळवलं. त्यांनी जबरदस्त पुनरागमन केलं. त्यांचं संपूर्ण लक्ष गुंतवणूकदार आणि शेअर धारकांवर केंद्रित होतं.
9 / 10
अमेरिकन सरकारनं आपल्या तपासात अदानी समूहाला क्लिनचीट दिली आहे. युएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशननं आपल्या तपासात अदानी समूहावर करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचं म्हटलं. तसंच हे आरोप कोणत्याही पुरव्यांशिवाय योग्य आहेत असं गृहित धरणं चुकीचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. याच वृत्तानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली.
10 / 10
शेअर बाजारातील तेजीचा फायदा त्यांनाही मिळाला. मंगळवारी एका दिवसात अदानी समूहाच्या कंपन्यांचं मार्केट कॅप एका दिवसात १.९२ लाख कोटींपर्यंत वाढलं. यासोबत कंपनीचं मार्केट कॅप ११ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचून १३.१८ लाख कोटींवर गेलं. बुधवारी कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत वाढले. यानंतर नंतर समूहाचं मार्केट कॅप १४.३६ लाख कोटींपार गेलं.
टॅग्स :businessव्यवसायAdaniअदानीshare marketशेअर बाजार