Hit Zoom, a new video call feature with 50 people in WhatsApp MMG
Zoom ला टक्कर, व्हॉट्सअॅपमध्ये ५० जणांसोबत व्हिडीओ कॉलचं नवं फिचर ? By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:47 PM1 / 12देशभरात गेल्या ५० दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉलींग होताना दिसत आहे. कधीकाळी हाय प्रोफाईल नागरिकांमध्येच व्हिडिओ कॉलिंगची क्रेझ होती. आता, व्हिडीओ कॉलिंग ही गरज बनली आहे.2 / 12व्हॉट्सअॅपकडून व्हिडिओ कॉलिंगचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊनच, झुमला टक्कर देणारं नवं फिचर ऍड करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. 3 / 12व्हॉट्सअॅप फिचरची माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाईटच्या वृत्तानुसार, लार्ज ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी मेसेंजर ग्रुपमध्ये रिडायरेक्ट करण्यात येऊ शकते. 4 / 12नुकतेच व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगमध्ये ८ जणांना सहभागी करुन घेता येईल, असे फिचर दिले आहे. दरम्यान, मेसेंजर रुम्स च्या माध्यमातून कंपनीकडून एकाचवेळी ५० जणांचं व्हिडिओ कॉलिंग होईल, असं फिचर दिलं आहे. 5 / 12WABetainfo ने WhatsApp Web Client च्या लेटेस्ट वर्जनमध्ये Messenger Room ची एक लिंक पाहिली, ही लिंक अँड्रॉईड वर्जनमध्येही देण्यात येणार असल्याचे समजते. 6 / 12व्हॉट्सअपने वेब क्लाईंटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जिथे एक पेपर क्लिप मेन्यू दिसून येत आहे. तेथे क्लिक केल्यास थेट मेसेंजर मेन्यूत रिडायरेक्ट केलं जाऊ शकतं. 7 / 12सध्या हे फिचर कशा रितीने अॅड करायचं हे कंपनीकडून सांगण्यात आलं नाही. कारण, व्हॉटसअपमध्ये ५० जणांचं ग्रुप कॉलिंग करण्यासाठी फेसबुकला अकाऊंट असणं बधनकारक असेल की नाही. 8 / 12देशभरात लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम पद्धतीने मोठ्या कंपन्यांमध्ये कामकाज सुरु आहे. या कंपन्यांकडून मिटींग्जच्या अरेंजमेंटसाठी सध्या झुम अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 9 / 12देशभरात लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम पद्धतीने मोठ्या कंपन्यांमध्ये कामकाज सुरु आहे. या कंपन्यांकडून मिटींग्जच्या अरेंजमेंटसाठी सध्या झुम अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 10 / 12देशभरात लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम पद्धतीने मोठ्या कंपन्यांमध्ये कामकाज सुरु आहे. या कंपन्यांकडून मिटींग्जच्या अरेंजमेंटसाठी सध्या झुम अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 11 / 12अनेकांना केवळ ग्रुप कॉलिंगसाठी झुम अॅप डाऊनलोड करावे लागत आहे. त्यामुळे, मोबाईलमध्ये आणखी एक अॅप डाऊनलोड वाढते. त्यामुळेच, व्हॉट्सअपने ही सुविधा सुरु केल्यास व्हॉट्सअॅप युजर्संना फायदा होईल. 12 / 12ग्रुप व्हिडीओ कॉलिंग हे आता गाव-खेड्यातही पोहोचले आहे, गावातील नागरिकही ग्रुप कॉलिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications