holi gift hdfc bank special fixed deposit scheme for senior citizens extended 30 june 2021
HDFC Bank : भारीच! HDFC बँकेने ग्राहकांना दिलं जबरदस्त होळी गिफ्ट; आता 30 जूनपर्यंत मिळणार 'ही' खास सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:20 AM1 / 10होळीच्या निमित्ताने एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ज्येष्ठांना एक जबरदस्त होळी गिफ्ट दिलं आहे. एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष निश्चित ठेव योजना (special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे. 2 / 10ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक सीनियर सिटिझन केअर एफडी स्कीम (Senior Citizen Care FD scheme) नावाची एक विशेष फिक्स्ड (एफडी) योजना ऑफर करते. सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँक या खास एफडीवर व्याज देते. 3 / 10कोरोना व्हायरसच्या काळात घसरलेल्या व्याजदरात ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी ऑफर 18 मे 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती. 4 / 10एसबीआयने सर्वात आधी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीम वाढवली होती. बँकेने एसबीआय वेअर डिपॉझिट योजना तीन महिन्यांसाठी 30 जूनपर्यंत वाढविली आहे.5 / 10एचडीएफसी बँक या ठेवींवर 75 बेसिस पॉईंट्स (bps) व्याज देत आहे. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल. हे दर 13 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहेत.6 / 10HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, 18 मे ते 30 जून या कालावधीत विशेष ठेवींच्या ऑफर दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के (सध्याच्या 0.50 टक्के प्रिमियमपेक्षा जास्त) अतिरिक्त प्रीमियम देण्यात येईल. 7 / 10मुदत ठेवी एका दिवसापासून 10 वर्षांपर्यंत 5 कोटीपेक्षा कमी आणि 5 वर्षांची असणे आवश्यक आहे. एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50% व्याज आणि 30-90 दिवसांच्या मुदतीत जमा असलेल्या ठेवींवर 3% व्याज देते.8 / 1091 दिवस ते 6 महिन्यांच्या ठेवींवरील व्याज दर 3.5 टक्के आणि एक महिना व 6 महिन्यांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याज दर 4.4 टक्के आहे. 9 / 10एफडी मॅच्युरिटीवर एका वर्षात बँक 4.9 टक्के व्याज देते. एक वर्ष आणि दोन वर्षात परिपक्व एफडी व्याज दर 4.9 टक्के आहे. 10 / 102 वर्ष ते 3 वर्ष या कालावधीत एफडीवर 5.15 टक्के व्याज आणि 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याज 5.30 टक्के आहे. मुदतपूर्व कालावधी 10 ते दहा वर्षे असेल तर ठेवींवर 5.50 टक्के व्याज दिले जाईल. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications