मुंबईकरांच्या कमाईच्या 51% रक्कम होमलोनच्या हप्त्यांवर होतेय खर्च, पुण्याचा नंबर कितवा? By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 5:03 PM
1 / 7 Home Loan EMI Burden: स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाला वाटतं. आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी कुणी पूर्ण पैसे भरतो तर कुणी कर्ज घेतो. पण, कर्ज काढून घर घेणाऱ्याच्या उत्पन्नातील मोठा भाग EMI भरण्यात खर्च होतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण स्वप्नांचे शहर मुंबईत जे होम लोन घेऊन घर विकत घेतात, त्यांच्या उत्पन्नातील 50 टक्क्यांहून अधिक EMI भरण्यात जातो. 2 / 7 अलीकडेच, रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक इंडियाने प्रोप्रायटरी अफोर्डेबिलिटी इंडेक्सवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, देशातील सर्वात महाग घरे मुंबईत आहे. मुंबईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 50 टक्क्यांच्या वर आहे, याचा अर्थ मुंबईच्या रहिवाशांच्या उत्पन्नापैकी 50 टक्क्यांहून अधिक रक्कम होम लोन EMI वर खर्च केली जाते. 3 / 7 2023 मध्ये मुंबईतील घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या 51 टक्के EMI भरण्यासाठी खर्च करावा लागला. पण, 2022 च्या तुलनेत यामध्ये सुधारणा झाली आहे. त्या वर्षात लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या 53 टक्के EMI भरण्यासाठी खर्च करावा लागला होता. मात्र, 2019 मध्ये कोरोना महामारीपूर्वी मुंबईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 67 टक्के होता. म्हणजेच गेल्या चार वर्षांत या निर्देशांकात 16 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. 4 / 7 घरांच्या किमतीबाबत मुंबईनंतर हैदराबाद दुसरे सर्वात महागडे शहर आहे. 2023 मध्ये हैदराबादचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 30 टक्के होता. 2022 मध्येही हा 30 टक्केच होता. हैदराबादमधील घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या 30 टक्के रक्कम EMI भरण्यासाठी खर्च करावी लागते. हैदराबादमध्ये 2023 मध्ये मालमत्तेच्या किमतीतही 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 5 / 7 यानंतर दिल्ली एनसीआर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातील घर खरेदीदारांना 2023 मध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या 27 टक्के EMI भरण्यासाठी खर्च करावा लागला. 2022 च्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. 2022 मध्ये 29 टक्के रक्कम EMI वर खर्च करावी लागली. 26 टक्के निर्देशांकासह बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई 25 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे. 6 / 7 नाइट फ्रँक इंडियाच्या निर्देशांकानुसार, अहमदाबाद सर्वात परवडणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. अहमदाबादच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या फक्त 21 टक्के रक्कम EMI भरण्यासाठी खर्च करावी लागते. अहमदाबाद नंतर, कोलकाता सर्वात स्वस्त बाजारपेठेत दुसऱ्या स्थानावर आहे. 2023 मध्ये कोलकाताच्या खरेदीदारांना त्यांच्या उत्पन्नाच्या 24 टक्के गृहकर्ज EMI वर खर्च करावे लागली. यानंतर पुण्याचा नंबर आहे. पुण्यातील घर खरेदीदारांना त्यांच्या उत्पन्नाच्या 24 टक्के रक्कम EMI वर खर्च करावी लागते. 7 / 7 या आकडेवारीवर, नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी शिशिर बैजल म्हणाले, देशाचा आर्थिक विकास दर स्थिर राहिल्यामुळे आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कमी चलनवाढीच्या शक्यतेमुळे यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेने 2024 मध्ये रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यास, गृहकर्जाचा ईएमआय कमी होईल. यामुळे 2024 मध्ये घर खरेदीदारांना दिलासा मिळेल. आणखी वाचा