शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home Loan : होमलोनचं व्याज जास्त आहे? कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करु शकता; जाणून घ्या प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 3:59 PM

1 / 9
Home Loan : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी आपण कष्ट करुन पैसे साठवत असतो. घर खरेदी करताना आपण गृहकर्ज सुद्धा घेत असतो. पण कधी कधी बँका कर्जाचे व्याज मोठ्या प्रमाणात वाढवत असतात.
2 / 9
यामुळे कर्ज परवड नाही, पण समजा तुम्ही ज्या बँकेत गृहकर्ज घेतलं त्या बँकेने कर्जाचे व्याज वाढवले. तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेऊ शकता. ज्या बँकेत व्याजदर कमी आहे त्या बँकेत आपण कर्ज ट्रान्सफर करुन घेऊ शकतो.
3 / 9
होमलोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. यासाठी आधी ही प्रोसेस काय आहे हे समजावून घेणे म्हत्वाचे आहे.
4 / 9
गृहकर्ज ट्रान्सफर करुन घेण्याआधी तुम्ही तुमच्या बँकेशी आधी व्याजदराबाबत बोला. जर तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल आणि तुम्ही तुमचे हप्ते वेळेवर भरत असाल तर, सध्याची बँक तुम्हाला सवलत देऊ शकते.
5 / 9
होमलोन नवीन बँकेकडे ट्रान्सफर करताना अतिरिक्त शुल्क पाहणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत, प्रक्रिया शुल्क, अर्ज शुल्क, प्रशासन शुल्क आणि पुनरावलोकन शुल्क असे शुल्क आकारले जाऊ शकते.
6 / 9
हे विद्यमान बँका आणि नवीन वित्तीय संस्थांना लागू होते. गृहकर्ज हस्तांतरित करणे तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा नवीन वित्तीय संस्थेसह तुमची एकूण रक्कम सध्याच्या बँकेच्या व्याजाच्या रकमेपेक्षा कमी असेल.
7 / 9
होमलोनसाठी अर्ज करताना बहुतांश अटी व शर्ती लक्षात ठेवाव्या लागतात. यामुळे भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होतात. तसेच, जर तुमची कर्जाची मुदत पूर्ण होत असेल किंवा तुमची मालमत्ता विकण्याची योजना असेल, तर तुम्ही कर्ज ट्रान्सफर करणे टाळावे.
8 / 9
होमलोन ट्रान्सफर करताना सगळ्यात पहिल्यांदा विविध बँकांचे व्याजदर आणि अटींची तुलना करा. नव्या कर्जासाठी तुमची पात्रता तपासा आणि नवीन कर्जासाठी अर्ज करा.
9 / 9
उत्पन्नाचा पुरावा, पत्ता पुरावा, ओळख पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. जुने लोन बंद करण्यासाठी अर्ज करा आणि नवीन कर्ज सुरू करण्यासाठी अर्ज करा.
टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय