home loan interest rate sbi,hdfc bank, kotak bank, icici bank home loan
Home Loan Rates: तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी गृहकर्ज घेताय? 'या' बँका देतायेत स्वस्त कर्ज By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 5:59 PM1 / 8नवी दिल्ली : आपल्या हक्काचे एक घर असावे, असे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण आयुष्यभर कष्ट करतो. तरीही हे स्वप्न फार कमी लोक पूर्ण करू शकतात. वाढत्या महागाईमुळे कोणत्याही भक्कम आधाराशिवाय घर बांधणे शक्य होत नाही. 2 / 8अशा परिस्थितीत बँका तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी मदत करतात. दरम्यान, अनेक बँका वेगवेगळ्या व्याजदरावर गृहकर्ज (होम लोन) देत आहेत. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गृहकर्जाचीही गरज भासेल. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांना वेगवेगळ्या दराने गृहकर्ज दिले जाते. 3 / 8गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण निश्चितपणे अनेक बँकांचे व्याजदर पाहिले पाहिजेत. कारण गृहकर्ज हे दीर्घकाळ सुरू असते. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही बँकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल माहिती देत आहोत.4 / 8स्टेट बँक ऑफ इंडियाचे टर्म लोन नोकरदार लोकांना 6.80 टक्के ते 7.30 टक्के दराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे.5 / 8एचडीएफसी बँकेकडून 6.75 टक्के ते 7.15 टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जाते. महिलांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर 6.75 ते 7.25 टक्क्यांपर्यंत आहे. 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 7.05 ते 7.55 टक्के दराने दिले जात आहे.6 / 8बँक ऑफ बडोदा नोकरदारांना 6.50 टक्के ते 7.85 टक्के दराने गृहकर्ज घेत आहे. याचबरोबर बँक स्वयंरोजगारांना 6.50 टक्के ते 7.85 टक्के दराने गृहकर्ज देत आहे.7 / 8एका खास ऑफर अंतर्गत, कोटक महिंद्रा बँक 10 डिसेंबरपर्यंत गृहकर्ज घेणार्यांना 6.55 टक्के सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज देत आहे. याशिवाय, स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी 6.6 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्यावतीने नोकरदारांना 6.55 टक्के ते 7.10 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. स्वयंरोजगार असलेल्या लोकांना 6.65 टक्के ते 7.25 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे.8 / 8आयसीआयसीआय बँक नोकरदार लोकांना 6.70 टक्के ते 7.40 टक्के व्याजाने गृहकर्ज देत आहे. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना 6.90 टक्के ते 7.55 टक्के गृहकर्ज दिले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications