शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रॉपर्टी कधी खरेदी करायची, कधी विकायची?; निर्णय घेण्यास मदत करेल Housing Pricing Index

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 4:22 PM

1 / 15
रिअल इस्टेट पोर्टल housing.com आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसनं (ISB) सोमवारी ३१ मे रोजी Housing Pricing Index (HPI) लाँच केलं आहे.
2 / 15
हे इंडेक्स देशभरातील ८ प्रमुख शहरांतील रहिवासी संपत्तींच्या किंमती ट्रॅक करेल आणि त्यामुळे सर्व स्टेकहोल्डर्सना रिअल टाईम डेटाही मिळेल.
3 / 15
रिअल इस्टेट पोर्टल आणि बिझनेस स्कूलच्या भागीदारीत तयार करण्यात आलेल्या हाऊसिंग प्रायसिंग इंडेक्स एका व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे हाऊसिंग अँड अर्बन अफेयर्स सेक्रेटरी दुर्गा शंकर मिश्रा यांनी लाँच केलं.
4 / 15
हे इंडेक्स ना केवळ घर खरेदीदारांसाठी मदतीचं ठरणार आहे, तर हे पॉलिसी मेकर्सच्या भविष्यातील योजना तयार करण्यासाठीही उपयुक्त पडेल.
5 / 15
आपल्यासाठी या इंडेक्सची फार आवश्यकता होती आणि हे देशाच्या उभारणीत मदतीचं ठरणार असल्याची प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली. नॅशनल हाऊसिंग बँकेनंही आपला हाऊसिंग प्रोडक्ट इंडेक्स लाँच केला असल्याची माहिती त्यांन यावेळी दिली.
6 / 15
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे या शहरांचा या इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे.
7 / 15
हाऊसिंग डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार हा इंडेक्स आयएसबीचे श्रीनी राजू सेंटर फॉर आयटी अँड द नेटवर्क्ड इकॉनॉमीच्या (SRINI) मदतीनं तयार करण्यात आला आहे.
8 / 15
एचपीआयच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला घरांच्या किंमती आणि त्याच्याशी निगडीत माहिती मिळणार आहे.
9 / 15
यामुळे घर खरेदीदारांना प्रॉपर्टीच्या खरेदीची माहिती मिळू शकेल आणि कोणत्या वेळी विकल्यानं फायदा होऊ शकेल हेदेखील समजेल.
10 / 15
याशिवाय धोरणं ठरवणाऱ्यांना आणि फायनॅन्शिअल अॅनालिस्ट्ससाठी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये शक्यतांवरून आता योग्य अंदाज बांधण्यास याचा वापरही करता येणार आहे.
11 / 15
खरेदीदार आणि धोरण ठरवणाऱ्या व्यक्ती कोणत्याही क्वालिटी हाय फ्रिक्वेन्सी डेटाच्या अनुपस्थितीत भारतातील शहरांच्या संपत्तीच्या किंमतीतील चढ उतारांवर असलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार निर्णय घेतात, असं हाउसिंगडॉटकॉम, मकानडॉटकॉम आणि प्रोपाटायगरडॉटकॉम समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी सांगितलं.
12 / 15
हाऊसिंग प्रायझिंग इंडेक्स आल्यामुळे आता या समस्येवर तोडगा काढता येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
13 / 15
एचपीआयमुळे सर्व स्टेकहोल्डर्सना आपले निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आयएसबीचे डीन राजेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.
14 / 15
हा इंडेक्स लाँच करण्याचा मुख्य उद्देश पारदर्शकता आणि या क्षेत्रातील स्टेक होल्डर्सच्या दरम्यान असलेल्या विश्वास वाढवणं हे आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल रिअल एस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांनी दिली.
15 / 15
गेल्या काही वर्षांपासून विश्वासातील कमतरता आणि लिक्विडिटीची समस्या यामुळे हाऊसिंग क्षेत्राला मोठा फटका बसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
टॅग्स :HomeघरMONEYपैसाIndiaभारतMumbaiमुंबईPuneपुणेBengaluruबेंगळूरChennaiचेन्नई