how to check epf balance online; website, mobile, sms, missed call
EPF Balance Online: पीएफचा बॅलन्स कसा तपासावा? एकाच प्रश्नावर चार सोपे पर्याय; तुमच्या सोईचा जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:54 AM1 / 7गेल्या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) ८.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे पीएफ अकाउंट असणाऱ्यांचा आनंद दिवाळीआधीच द्विगुणित झाला आहे. ही व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे, पण ती तपासावी कशी.... पाहू या चार पर्याय..2 / 7ईपीएफओचे सदस्य असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात, यूएएन नंबर असेल, तर त्याचा वापर करून एसएमएसद्वारेही बॅलन्स चेक करता येईल.3 / 7त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर “EPFOHO UAN ENG” असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला आपल्या अकाउंटची विविध प्रकारची माहिती मिळू शकेल. यासाठी तुम्हाला कोणत्या भाषेत माहिती हवी आहे, हे आधी निवडावे लागले.4 / 7ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाइल क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊनही खात्यातील शिल्लक तपासता येते. मात्र, ही सेवा यूएएन नंबर असणाऱ्या आणि केवायसी अपडेट असणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.5 / 7www.epfindia.gov.in/ पीएफ बॅलन्स ऑनलाइनही पाहता येते. त्यासाठी ईपीएफओच्या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे Our Services वर क्लिक केल्यानंतर for employees हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करावे लागेल. 6 / 7त्यानंतर, Services या टॅबमध्ये Member passbook वर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला आपल्या बॅलन्स कळू शकेल.7 / 7उमंग किंवा ईपीएफओ ॲपवरही पीएफचे बॅलन्स चेक करता येते. यापैकी एक ॲप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर ॲपमध्ये लॉगइन केल्यानंतर तुम्हाला पासबुक पाहून बॅलन्स तपासता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications