how to check pf balance through sms on epfo website know pf account benefits
EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 1:20 PM1 / 15कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) सर्व कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा देते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यासाठी कापली जाते.2 / 15पीएफच्या माध्यमातून बचत झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. मात्र केवळ निवृत्तीनंतरच नाही तर पीएफ खातेधारकांना या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतात.3 / 15अनेकदा आपल्याला आपल्या खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे याची माहितीही नसते किंवा ते जमा होतायत का नाही हेदेखील माहिती नसतं. परंतु आज आपण जाणून घेऊया घरबसल्या ते कसं तपासून पाहू शकाल.4 / 15जर तुम्ही EPFO मध्ये रजिस्टर केलेला क्रमांक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो आणि एसएमद्वारे तुमच्या खात्यातील जमा रकमेची माहिती तुम्हाला मिळू शकेल.5 / 15यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN ENG (शेवटची तीन अक्षरं भाषेच्या पर्यायांसाठी आहेत.) असं लिहून पाठवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुमच्या खात्यातील जमा रकमेची माहिती मिळेल.6 / 15जर तुम्हाला मराठी भाषेत याची माहिती हवी असेल तर तुम्हाला EPFOHO UAN MAR लिहून मेसेज करावा लागेल.7 / 15PF बॅलन्स तपासण्याची ही सेवा तुम्हाला इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्ये मिळू शकते.8 / 15पीएफ बॅलन्ससाठी तुम्हाला युएएन, बँक खातं, पॅन (PAN) आणि आधार (Aadhaar Card) लिंक्ड असणं आवश्यक आहे.9 / 15EPFO च्या वेबसाईटवरूनही तुम्ही पासबुकवर आपला बॅलन्स तपासू शकता. पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे युएएन क्रमांक असणं आवश्यक आहे. 10 / 15पीएफ खात्यासह ग्राहकांना अनेक सुविधाही देण्यात येतात. यामध्ये विमा, करात सवलत, निवृत्तीवेतन, निष्क्रिय पीएफ खात्यांवर व्याज आणि गरजेच्या वेळी पैसे काढण्यासारखी सुविधाही देण्यात येते. 11 / 15कुठल्याही कर्मचाऱ्याचे पीएफ अकाऊंट उघडले की, त्याचा आपोआप विमा उतरवला जातो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इंश्योरन्स (ई़डीएलआय)च्या अंतर्गत कर्मचाऱ्याचा ७ लाखांपर्यंतचा विमा उतरवला जातो. 12 / 15ईपीएफओच्या सक्रीय सदस्यांच्या सेवेच्या अवधीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नामित आणि कायदेशीर वारसांना ७ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. ही मदत कंपन्या आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देतात. हल्लीच यामधील मदतीची रक्कम ६ लाखांवरून वाढवून सात लाख रुपये करण्यात आली आहे.13 / 15तुम्हाला करामध्ये सवलत हवी असेल तर पीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र नव्या टॅक्स सिस्टिममध्ये अशी सुविधा नाही आहे तर जुन्या टॅक्स सिस्टिममध्ये ही सुविधा आहे हे तुम्हाला ठाऊक असले पाहिजे. ईपीएफ खातेधारक प्राप्तिकर कलम ८०सी नुसार त्यांच्या पगारावर लागू होणाऱ्या करामध्ये १२ टक्क्यांपर्यंतची बचत करू शकतात.14 / 15पीएफ अकाऊंटमध्ये जमा रकमेमधून ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये वर्ग केली जाते. ही रक्कम निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाच्या रूपात मिळते. निवृत्तीवेतन हा व्यक्तीचा वृद्धापकाळातील मोठा आधार असते. त्यासाठी सरकार विविध योजनाही चालवत असते.15 / 15पीएफ फंड ही एक उत्तम सुविधा आहे. यामधून तुम्ही गरजेच्या वेळी ठराविक पैसे काढू शकता. त्यामुळे तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications