शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अनिल अंबानींसाठी आशेचा किरण बनला मुलगा अनमोल, निर्माण केली ₹२००० कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 8:27 AM

1 / 7
मुकेश अंबानींप्रमाणेच त्यांचा भाऊ अनिल अंबानी यांचाही एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता. पण, आज ते मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. २०२० मध्ये अनिल अंबानींनी ब्रिटीश न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केलं होतं. ते सध्या अनेक प्रकरणात अडकले आहेत.
2 / 7
पण या कठीण काळात अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल हा अंबानी कुटुंबासाठी आशेचा किरण बनून पुढे आला आहे. त्यांना व्यवसायाची सखोल माहिती आहे. रिलायन्स कॅपिटलमध्ये सुरुवात केल्यानंतर, त्यानं कॉर्पोरेट क्षेत्रात तेजीनं प्रगती केली. जय अनमोल अंबानी यांनी आर्थिक अस्थिरतेदरम्यान समूहाच्या शेअरची किंमत मजबूत केली आहे. जय अनमोल यांच्या कार्यक्षम धोरणांमुळे जपानमधून गुंतवणूक आली आहे. तसंच नवीन उद्योगांना प्रोत्साहन दिलं आहे.
3 / 7
अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती १.८३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. अनमोल अंबानी यांचा जन्म अतिशय श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून झालं. यानंतर त्यांनी ब्रिटनमधील सेव्हन ओक्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्यांचा प्रवास सोपा नव्हता.
4 / 7
जय अनमोल अंबानी अगदी लहान वयातच कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. अनिल अंबानी समूहाच्या अनेक उपकंपन्यांचे प्रमुख होते. पण, ते विशेषतः रिलायन्स कॅपिटलमध्ये सक्रिय होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये इंटर्नशिप सुरू केली.
5 / 7
२०१६ मध्ये रिलायन्स कॅपिटलच्या बोर्डात अतिरिक्त संचालक म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे विविध पदांवर काम केलं. त्यांच्या आधुनिक व्यवस्थापन कौशल्यासाठी आणि नवीन दृष्टिकोनासाठी त्यांना अनेकदा श्रेय दिलं जातं. त्यानंतर ते रिलायन्स निप्पॉन लाइफ ॲसेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्सच्या बोर्डातही सामील झाले.
6 / 7
अनिल अंबानींच्या वाढत्या आर्थिक अडचणींदरम्यान अनमोल यांच्या नेतृत्वाखाली समूहाच्या शेअर्सना गती मिळाली. त्यांच्या एन्ट्रीमुळे रिलायन्स ग्रुपच्या शेअर्सच्या किमतीत ४० टक्क्यांनी मोठी वाढ झाली. या तरुण व्यावसायिकाने अनुभवी जपानी फर्म निप्पॉनला रिलायन्समधील सहभाग वाढवण्यासही महत्त्व पटवून दिले. यामुळे रिलायन्स लाइफ इन्शुरन्स आणि रिलायन्स कॅपिटल ॲसेट मॅनेजमेंट हे दोन नवीन उपक्रम सुरू करण्यात मदत झाली.
7 / 7
जागरणच्या एका रिपोर्टनुसार, अनमोल अंबानींची एकूण संपत्ती सध्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जय अनमोल अंबानी यांच्याकडे लॅम्बोर्गिनी गॅलार्डो आणि रोल्स रॉयस फँटम सारख्या काही महागड्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे हेलिकॉप्टर आणि विमानही आहे. त्याचा वापर ते अधिक व्यावसायिक प्रवासासाठी करतात.
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्स