शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 10:42 AM

1 / 5
गेल्या काही आठवड्यांत वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. यामुळे रोज लागणाऱ्या आणि टीव्ही-फ्रिज यांसारख्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांनी सवलत देत ग्राहकांना फायदा देण्यास सुरुवात केली आहे. अचानक किमती का कमी झाल्या ते जाणून घेऊ..
2 / 5
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, कपडे आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर कंपन्यांनी सवलत देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
3 / 5
वाढत्या महागाईने मोठ्या प्रमाणावर माल पडून राहिल्याने कंपन्यांवर दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी एंट्री-लेव्हल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत आणि त्यावर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात सवलतींमुळे त्यांची विक्री वाढेल अशी कंपन्यांची अपेक्षा आहे.
4 / 5
८०% गेल्या दोन-तीन महिन्यांत भारतात इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांसह सेमीकंडक्टर चिपच्या किमती कमी झाल्या आहेत. २५%मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या गॅझेट्सची किंमत गेल्या दोन वर्षांत वाढली २०% इलेक्ट्रॉनिक आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती उतरण्याची शक्यता. २०% ते ५० टक्क्यांपर्यंत एफएमसीजी कंपन्यांच्या एकूण उत्पादन खर्चात कपात झाली. पाम तेल स्वस्त झाल्याचा कंपन्यांना फायदा झाला.
5 / 5
सॅमसंग, एलजी व सोनी सारख्या कंपन्यांनी टीव्हीच्या किमतीमध्ये ५ ते १० टक्क्यांनी कपात केली आहे. तर ते रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनवर ५ ते १०% सूट देत आहेत. लॅपटॉपवर २ हजारांची सूट देण्यात येत आहे. कंपन्या स्मार्टफोन खरेदीवर ४-५% सूट देत आहेत. खाद्यतेलाच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे कंपन्यांनीही बिस्किटांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन