How to get deducted Income tax Refund? Know, remove all doubts in your mind ...
Income tax Refund: कापला गेलेला टॅक्स परत कसा मिळवायचा? जाणून घ्या, मनातील सर्व शंका दूर करा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 12:39 PM1 / 10इन्कम टॅक्स रिटर्न भरतेवेळी यंदा दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय पारंपरिक पद्धतीचा म्हणजे करपात्र उत्पन्न नसेल तर करपरतावा मिळवण्याचा आणि दुसरा पर्याय आहे कन्सेशनल टॅक्स अर्थात सवलतीतील कराचा. तुम्ही कोणता पर्याय निवडला आहे?2 / 10तुम्ही जर जुन्या करपद्धतीप्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स कायद्यातील ८०सी ते ८०यू या कलमांतर्गत करबचतीच्या वजावटींशी संबंधित तपशील भरणे क्रमप्राप्त असते. 3 / 10तुमच्या नियोक्त्याने पगारावरील कर कमी कापावा यासाठी या बचतींची माहिती तुम्ही भरली असेल तर त्यासंदर्भातील फॉर्म क्रमांक १६ नियोक्त्याकडे मागावा. 4 / 10तुम्ही नियोक्त्याकडे ही माहिती दिली नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या वजावटींची माहिती तुम्ही भरू शकता. त्यासाठी आयटीआर-१ हा अर्ज उपलब्ध आहे.5 / 10८०सी, ८०सीसीसी, ८०सीसीडी(१), ८०सीसीडी(१बी) आणि ८०सीसीडी (२) अनेकदा ८०सी कलमांतर्गत करबचतीसाठी दावा केला जातो. 6 / 10८०सीसीसी आणि ८०सीसीडी(१) अंतर्गतही करबचत केली जाऊ शकते. नॅशनल पेन्शन सिस्टीम, अटल पेन्शन योजना यात गुंतवणूक करून करबचत करता येते. वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत बचत केली जाणे गरजेचे आहे.7 / 10आर्थिक वर्षात २५ हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा योजनेवर प्रीमियम भरल्यास इन्कम टॅक्स कायद्यातील ८०डी कलम लागू होऊन करातून ही रक्कम वजा होऊ शकते. 8 / 10प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्सवरही करदाता पाच हजार रुपयांपर्यंतच्या करवजावटीचा दावा करू शकतो.9 / 10उच्च शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, भाडेकरार असल्यास, गृहकर्ज, इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज10 / 10घरामध्ये कोणी अपंग व्यक्ती असल्यास त्याची काळजी घेण्यासाठी झालेल्या खर्चावरही करबचत करता येऊ शकते. कलम ८०डीडीखाली तत्सम तरतूद आहे. मात्र, अपंग व्यक्ती स्वत:च करबचत करण्यास उत्सुक असेल तर त्यासाठी कलम ८०यू अंतर्गत तरतूद आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications