how to get duplicate aadhaar card online after it get lost or misplaced with uidai website online
Aadhaar Card हरवलंय?, काळजी करू नका; घर बसल्या 'असं' मिळेल नवं कार्ड By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 3:20 PM1 / 14सध्या आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्रं झालं आहे. अनेक सरकारी कामांसाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. 2 / 14जर अशा परिस्थितीत तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा ते गहाळ झालं असेल तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 3 / 14परंतु जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही नाममात्र शुल्क देऊन तुमच्या आधार कार्डाची प्रिन्ट घरबसल्या मागवू शकता.4 / 14आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय) यापूर्वी आधार कार्डचं ई व्हर्जन डाऊनलोड करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर तुम्हाला ते आधार कार्ड प्रिन्ट करता येत होतं.5 / 14परंतु आता नव्या सुविधेअंतर्गत ग्राहकांना प्रिन्ट केलेलं आधारकार्ड घरबसल्या मिळू शकतं. यासाठी तुम्हाला केवळ ५० रूपये शुल्क द्यावं लागणार आहे. 6 / 14सर्वप्रथम तुम्हाला आधारच्या http://www.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला My Aadhaar या सेक्शनच्या आत Get Aadhaar बा ऑप्शन पाहायला मिळेल.7 / 14त्याच्या खाली असलेल्या पर्यायांमधून Retrieve Lost or Forgotten EID/UID या पर्यायावर क्लिक करावं.8 / 14त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स द्याव्या लागतील.9 / 14तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक, नामांकन संख्या (EID), पूर्ण नाव, नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक अशी माहिती द्यावी लागेल.10 / 14जर तुम्हाला तुमचा फोन क्रमांक द्यायचा नसेल तर तुम्ही तुमचा ईमेल आयडीदेखील देऊ शकता. 11 / 14त्यानंतर त्या ठिकाणी असलेला CAPTCHA तुम्हाला टाकावा लागेल. तसंच Seng OTP किंवा Send TOTP या ऑप्शनवर क्लिक करा.12 / 14यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. तर TOTP हा ऑप्शन mAADHAAR अॅपवर पाठवला जातो. 13 / 14त्यानंतर तुमचं पेमेंट गेटवे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला ५० रूपये शुल्क भरावं लागेल. 14 / 14तुम्ही शुल्क भरल्यानंतर स्पीड पोस्टद्वारे पुढील पंधरा दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्डाची कॉपी तुमच्या घरी येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications