how is the digital rupee different from upi payments paytm know the all details and process of use
UPI पेमेंट, पेटीएम आणि Digital Rupee मध्ये काय आहे फरक? २ मिनिटांत दूर करा कनफ्युजन By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 4:35 PM1 / 7भारतात आता लोक खिशात पैसे न ठेवता पेमेंट वॉलेटमध्ये (Payment Wallet) पैसे घेऊन जातील. देशात याची सुरूवात 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 डिसेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून रिटेल डिजिटल रुपी लाँच करणार आहे. 2 / 7पायलट प्रोजेक्ट दरम्यान, रिटेल डिजिटल रुपयाचे वितरण, वापर आणि तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असे नाव देण्यात आले आहे. पण डिजिटल रुपयाचे नाव ऐकताच तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की आता पेटीएम, गुगल पे आणि फोन पेचे काय करायचे?3 / 7आजच्या काळात, आपण कोणत्याही दुकानात सर्व प्रकारच्या ई-वॉलेटवरून UPI वापरून पेमेंट करतो. परंतु याला डिजिटल चलन म्हणता येणार नाही, कारण UPI द्वारे हस्तांतरित केलेले पैसे केवळ फिजिकल करन्सीद्वारे चालतात. याचा अर्थ UPI पेमेंटसाठी वापरले जाणारे चलन सध्याच्या फिजिकल चलनाच्या प्रमाणेच आहे. डिजिटल रुपया हे आपल्यातच अंडरलाईन्ड पेमेंट असेल जे चलनाऐवजी डिजिटल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते.4 / 7रिझर्व्ह बँकेने जारी केलेला ई-रुपी डिजिटल टोकन म्हणून काम करेल. दुसऱ्या शब्दांत, CBDC हे RBI द्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप आहे. आता UPI आणि डिजिटल रुपयामधील आणखी एक फरक समजून घेऊ.5 / 7वास्तविक, UPI पेमेंट म्हणजे थेट बँक खाते ते बँक खाते. रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयासाठी म्हटले आहे की पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटद्वारे त्याचा वापर केला जाऊ शकतो. UPI वेगवेगळ्या बँका हाताळतात आणि या बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली काम करतात. पण तुमचा डिजिटल रुपया थेट रिझव्र्ह बँकेद्वारे चालवला जाईल आणि त्यावर देखरेख केली जाईल. त्याच्या वितरणात उर्वरित बँकांचा सहभाग असेल. 6 / 7डिजिटल रुपयाचे व्यवहार पर्सन टू पर्सन (P2P) आणि पर्सन टू मर्चंट (P2M) दोन्ही करता येतात. याशिवाय, जर तुम्हाला व्यापार्याला पैसे द्यावे लागतील, तर तुम्ही त्याच्याकडे असलेला QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. सरळ शब्दात समजून घ्यायचं झालं तर देशाचे स्वतःचे डिजिटल चलन सुरू होणार आहे. कारण आपले ऑनलाइन पेमेंट केवळ फिजिकल करन्सीने चालते. 7 / 7बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डिजिटल रुपया पेटीएम आणि गुगल-पे सारख्या मोबाईल वॉलेटशी स्पर्धा करू शकत नाही. डिजिटल रुपया ही पेमेंटची एक नवीन पद्धत आहे. या अंतर्गत, तुम्हाला एकदाच बँकेतून डिजिटल रुपया खरेदी करावा लागेल. त्यानंतर तुम्ही वॉलेट ते वॉलेटपर्यंत व्यवहार करू शकाल. आणखी वाचा Subscribe to Notifications