शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:24 PM

1 / 9
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सीटीसी, बेसिक सॅलरी, नेट सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी हे नक्कीच ऐकलं असेल. अनेकदा लोक एकमेकांशी चर्चा करताना आपण सीटीसी आणि बेसिक सॅलरी वगैरेबद्दलही बोलतो. आपल्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बेसिक सॅलरीचा मोठा वाटा आहे.
2 / 9
पण बेसिक सॅलरी कशी तयार केली जाते, निव्वळ पगार आणि ग्रॉस सॅलरी मध्ये काय फरक आहे आणि सीटीसीमध्ये काय समाविष्ट आहे, या गोष्टी अनेकांना नोकरी करूनही नीट समजत नाहीत. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा नवीन जॉईन झाला असाल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
3 / 9
सध्या पगाराची निश्चित व्याख्या नाही. याचा फायदा कंपन्या घेतात. पगाराची रचना तयार करताना अनेकदा कंपन्या तुमचा बेसिक पगार कमी ठेवतात आणि इतर भत्ते वाढवतात. अशावेळी तुम्ही कंपनीला तुमच्यानुसार तुमचा बेसिक पगार ठरवण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही.
4 / 9
पण जर तुमचा बेसिक पगार खूपच कमी असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीतील एचआर विभागाला ते वाढवण्याची विनंती करू शकता. साधारणपणे बेसिक सॅलरी तयार करताना त्या व्यक्तीचा नोकरीचा अनुभव, नोकरीची भूमिका आणि शैक्षणिक पात्रता आदी बाबी तपासल्या जातात.
5 / 9
बेसिक सॅलरी कमी असणं आणि अधिक असणं या दोन्ही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. मूळ वेतनावर नेहमीच कर आकारला जातो, म्हणून तो सीटीसीच्या ४० ते ५०% पेक्षा जास्त नसावा. पण त्यात जास्त कपात केल्यास त्याचा परिणाम तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरवर होतो. कमी बेसिक सॅलरीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे पीएफ योगदान जास्त नसते.
6 / 9
बेसिक सॅलरी कमी असणं आणि अधिक असणं या दोन्ही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. मूळ वेतनावर नेहमीच कर आकारला जातो, म्हणून तो सीटीसीच्या ४० ते ५०% पेक्षा जास्त नसावा. पण त्यात जास्त कपात केल्यास त्याचा परिणाम तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरवर होतो. कमी बेसिक सॅलरीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे पीएफ योगदान जास्त नसते.
7 / 9
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता आणि इतर सर्व भत्ते मूळ वेतनात जोडले जातात आणि कोणत्याही प्रकारच्या वजावटीच्या आधी जी रक्कम तयार केली जाते त्याला ग्रॉस सॅलरी म्हणतात. समजा तुमचा मूळ पगार २०,००० आहे, ज्यामध्ये ४००० रुपये महागाई भत्ता, ९००० रुपये घरभाडं भत्ता आणि १००० रुपये वाहन भत्ता आणि ५००० रुपये इतर भत्त्यांमध्ये जोडले गेले तर तुमचा एकूण पगार एकूण ३९००० रुपये होईल.
8 / 9
कर, भविष्य निर्वाह निधी व इतर प्रकारची कपात करून जी सॅलरी म्हणून दिली जाते, त्या रकमेला नेट सॅलरी असं म्हणतात. नेट सॅलरी म्हणजे कर्मचाऱ्याचा टेक-होम पगार म्हणजेच दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या खात्यात येणारी अंतिम रक्कम.
9 / 9
सीटीसी म्हणजे Cost to Company. म्हणजे कंपनी वर्षभर आपल्या कर्मचाऱ्यावर खर्च करणारा पैसा. सीटीसीमध्ये आपल्या मूळ वेतनापासून प्रवास भत्ता, कम्यनुकेशन अलावंस, वैद्यकीय विमा आणि बचत योगदान इ. सर्व गोष्टींचा समावेश असतो. अनेकदा कंपन्या त्यात ग्रॅच्युइटीचाही समावेश करतात. ग्रॅच्युइटी म्हणजे कोणत्याही कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्याला त्याच्या चांगल्या कामाचं बक्षीस म्हणून दिलेली रक्कम, जी त्याला नोकरी सोडल्यानंतर दिली जाते.
टॅग्स :jobनोकरीMONEYपैसा