in how many days will your money be refunded if online transaction fails
Online Transaction फेल झाल्यास पाहा किती दिवसांत मिळतो रिफंड By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 12:47 PM1 / 122020-21 आर्थिक वर्षाच्या शेवटी होळी आणि रंगपंचमीच्या सुट्टीमुळे बँकांचं कामकाज बंद होतं. अशा परिस्थितीत जर आपण ऑनलाइन व्यवहार केले असतील आणि ते पूर्ण झाले नसतील तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.2 / 12रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार तुमचे पैसे ठराविक वेळेत परत केले जातील.3 / 12या कालावधीत ज्या ग्राहकांची ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स फेल झाली होती परंतु त्यांचे पैसे कापले गेले होते अशा ग्राहकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. 4 / 12 यासंदर्भात एपीसीआयनं २ एप्रिल रोजी या प्रकरणी ट्वीटही केलं. यामुसार आता परिस्थिती सामान्य आहे आणि आता ग्राहक करत असलेले ट्रान्झॅक्शन्सही पूर्ण होणार आहेत. 5 / 12परंतु मोठ्या संख्येत अशी लोकं आहेत ज्यांचे रिफंडची अमाऊंट अद्यापही आलेली नाही. 6 / 12अशातच किती दिवसांमध्ये एनईएफटी, आरटीजीएस आणि युपीआय ट्रान्झॅक्शन्सद्वारे पैसे परत येतील असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.7 / 1219 सप्टेंबर 2019 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक पत्रक जारी केलं होतं. तसंच यात निश्चित कालावधीत फेल झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे पैसे परत आले नाहीत तर बँकेला प्रत्येक दिवसाच्या हिशोबानं 100 रूपये लेट पेमेंट द्यावं लागेल असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.8 / 12रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार जर ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये ती अमाऊंट क्रेडिट झाली नाही तर T + 1 (यात T हा दिवसांच्या संदर्भात आहे) या हिशोबानं बँकेला पेनल्टी द्यावी लागेल. हाच नियम युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठीही लागू आहे.9 / 12जर तुम्ही एटीएम किंवा मिनी एटीएममधून पैसे काढले आणि तुमची कॅश आली नाही, तसंच पैसे कट झाले तर तुम्हाला पाच दिवसांच्या आत पैसे परत करावे लागतील. 10 / 12तसंच पाच दिवसांच्या आत पैसे परत न आल्यास T + 5 च्या हिशोबानं दिवस + 100 अशी पेनल्टी द्यावी लागेल. 11 / 12जर कार्डातून पैसे कापले गेले आणि ते लाभार्थ्याला पोहोचले नाही तर एका दिवसात ते पैसे परत येणं आवश्यक आहे. जर उशीर झाला तर T + 1 (दिवस + 100) अशी पेनल्टी लागते. 12 / 12ई कॉमर्स वेबसाईटद्वारे पैसे कापले गेले तर तुम्हाला पाच दिवसांच्या आत ते पैसे मिळणं आवश्यक आहे. यासाठीबी जर उशीर झाला तर T + 1 (दिवस + 100) अशी पेनल्टी लागते. आणखी वाचा Subscribe to Notifications