शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 8:31 AM

1 / 7
उन्हाळ्यात घरात जवळपास २४ तास पंखे सुरु असतात. कूलर लावले जातात. एसीचा वापरही वाढतो. टीव्ही आणि फ्रीज आदींचा वापरही या काळात कमी होत नाही. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात विजेचे बिलही वाढते. कोणत्या उपकरणाने विजेचा नेमका किती वापर केला हे तुम्हाला कळू शकत नाही. कोणती उपकरणे अधिक विजेचा वापर करतात हे समल्यास तुम्हाला विजेचा वापर कमी करणे शक्य होईल. अधिक बिल आल्याने मनस्तापही होणार नाही.
2 / 7
उपकरणांवर दरमहिना विजेसाठी किती खर्च? १००० वॅट इतक्या क्षमतेचे कोणत्याही उपकरणाने तासभर विजेचा वापर केला तर वापरली गेलेली वीज १ युनिट इतके असते.
3 / 7
१०० वॅटचे कोणतेही उपकरण दिवसातू ४ तास चालत असेल तर त्याला ४०० वॅट वीज वापरली जाईल. दिवसाला त्यावर ०.४ युनिट वीज खर्च होईल. संपूर्ण महिनाभर यासाठी (०.४ x ३०) १२ युनिट वीज लागेल.
4 / 7
तुमच्या परिसरात जर विजेचा दर ८ रुपये प्रति युनिट इतका असेल तर या उपकरणावर महिनाभरासाठी (१२ x ८) एकूण ९६ रुपये इतका खर्च येईल.
5 / 7
याच दरानुसार १००० वॅटच्या उपकरणासाठी दरमहिन्याला विजेचा खर्च ९६० रुपये इतका येईल.
6 / 7
९ वॅटचे ३ बल्ब घरात १० तास लावले तर २७० वॅट इतक्या विजेचा वापर होतो. ६० वॅटचे ४ पंखे घरात १२ तासांसाठी लावल्यास २,८८९ वॅट वीज लागते. १६०० वॅट क्षमतेचा १ एसी ५ तास सुरु ठेवला तर ८,००० वॅट वीज खर्च होईल.
7 / 7
टीव्ही, फ्रिज, एसी, कूलर, पंखे, मिक्सर, वॉशिंग मशिन, ओव्हन, हिटर एलईडी लाईट्स आदी वस्तू घरोघर वापरल्या जातात. वस्तूच्या वापरावर किती वीज खर्च होते हे समजल्यास विजेच्या वापराचे नियोजन करणे शक्य होईल. महिनाभराच्या खर्चाचे नियोजन करताना विजेसाठी किती पैसे राखून ठेवायचे हे निश्चित करता येईल.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानelectricityवीज