शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 8:51 AM

1 / 8
Sukanya Samriddhi Yojana Calculator: मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. केंद्र सरकारनं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. कोणताही भारतीय आपल्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो. या योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज मिळत आहे.
2 / 8
यामध्ये वर्षाला किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत मुलीसाठी १५ वर्षांपर्यंत योगदान देता येतं. म्हणजेच ही योजना २१ वर्षांत मॅच्युअर होते. तुमच्या मुलीसाठी जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता येऊ शकते, तितक्या लवकर करा, जेणेकरून तुम्हाला तिच्यासाठी लवकर मॅच्युरिटीची रक्कम मिळू शकेल.
3 / 8
जर तुम्ही मुलीच्या जन्मापासूनच सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुमची मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम तयार झाली असेल. आता जाणून घेऊ जर तुम्ही महिन्याला १०००, २०००, ३००० किंवा ५००० रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीपर्यंत तुम्हाला किती नफा मिळेल.
4 / 8
जर तुम्ही या योजनेत दरमहा १००० रुपये गुंतवले तर वार्षिक १२ हजार रुपये जमा होतील. एसएसवाय कॅल्क्युलेटरनुसार, १५ वर्षांत एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक होईल आणि ३,२९,२१२ रुपये व्याजातून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण ५,०९,२१२ रुपये मिळतील.
5 / 8
जर तुम्ही महिन्याला २,००० रुपये गुंतवले तर तुम्ही वार्षिक २४,००० रुपये जमा कराल. एकूण गुंतवणूक ३,६०,००० रुपये आणि व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ६,५८,४२५ रुपये असेल. मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम १०,१८,४२५ रुपये असेल.
6 / 8
मासिक ३००० रुपयांनुसार हिशोब पाहिला तर वार्षिक ३६,००० रुपये जमा होतील. तुमची एकूण गुंतवणूक ५,४०,००० रुपये असेल. व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ९ लाख ८७ हजार ६३७ रुपये असेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १५,२७,६३७ रुपये मिळतील.
7 / 8
सुकन्या समृद्धी योजनेत ४००० रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक ४८,००० रुपये जमा होतील. १५ वर्षांत एकूण ७ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक होणार आहे. व्याजाचं उत्पन्न १३ लाख १६ हजार ८५० रुपये असेल. मुदतपूर्तीनंतर तुम्ही मुलीसाठी एकूण २० लाख ३६ हजार ८५० रुपयांचा निधी जमा कराल.
8 / 8
जर तुम्ही दरमहा ५००० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्ही वार्षिक ६०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. अशा प्रकारे १५ वर्षांत एकूण ९,००,००० रुपयांची गुंतवणूक होईल. व्याजातून १६,४६,०६२ रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर २५ लाख ४६ हजार ६२ रुपयांचा मोठा निधी तयार होऊ शकतो.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक