शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card: तुम्ही आधार कार्डात किती वेळा बदलू शकता नाव, वय आणि पत्ता? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 8:48 AM

1 / 7
आधार कार्डशिवाय (Aadhaar Card) आजच्या काळात आर्थिक असो किंवा अन्य कोणतंही काम पूर्ण करणं कठीण आहे. आधार हे आता आपल्या ओळखीचं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट बनलंय. बँकेत खातं उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड असण्यासोबतच त्यावर नोंदवलेली तुमची माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर असणं महत्त्वाचं आहे.
2 / 7
तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचं अपडेट करायचं असल्यास ते सहज करता येईल. तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्म तारीख आणि लिंग अपडेट (Address and Name Update in Aadhaar) करू शकता. मात्र यासाठीही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
3 / 7
देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक जारी केला जातो. हे आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केलं जाते. आधार कार्डमध्ये १२-अंकी विशिष्ट क्रमांक असतो, ज्यावरून संबंधित नागरिकाची माहिती मिळते. यामध्ये पत्ता, पालकांचं नाव, वय यासह अनेक माहिती नोंदवली जाते. आधार बनवताना एखादी माहिती चुकीची टाकली गेली असेल तर ती दुरुस्त केली जाऊ शकते, परंतु यासाठी UIDAI ने मर्यादा निश्चित केली आहे.
4 / 7
UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. UIDAI नुसार, एक आधार कार्ड धारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव आयुष्यात फक्त दोनदा बदलू शकतो. तसेच, तुम्ही आधारमध्ये तुमची जन्मतारीख फक्त एकदाच आधारमध्ये बदलू शकता. आधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही. तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच आधारमध्ये जेंडरची माहिती अपडेट करू शकता.
5 / 7
आधारमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. तरच तुम्ही कोणत्याही सुधारणा करू शकाल. लक्षात ठेवा की नाव, पत्ता किंवा जेंडर संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड फोन नंबर असणं आवश्यक आहे. कारण त्यावरील OTP शिवाय तुम्ही तुमच्या आधार डेटामध्ये कोणतेही बदल करू शकणार नाही.
6 / 7
जर तुम्हाला स्वतः बदल करायचा असेल तर UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो एन्टर करा. लॉगिन केल्यानंतर, होमपेजवर जा आणि प्रोसीड टू अपडेट आधारवर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
7 / 7
नंतर नाव बदलण्याचा (Name change) पर्याय निवडा आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट स्कॅन करून अटॅच करा. त्यानंतर सबमिट करा आणि 'ओटीपी सेंड' हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाका. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नाव बदलाचा अर्ज सबमिट होईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार