How To Post Office Internet Banking Registration
Post Office Internet Banking : तुम्हीही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग सुविधेचा घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज... By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 6:27 PM1 / 7आपण आपले जीवन जगण्यासाठी पैसे कमावतो, जेणेकरून आपल्या गरजा पूर्ण करता येऊ शकतील. याचबरोबर अनेक लोक त्यांच्या ठेवी बँकेत ठेवतात, जेणेकरून ते त्यांच्या गरजेनुसार थोडे थोडे पैसे काढू शकतील. तसेच, बँक त्यांना या पैशावर व्याजही देते. 2 / 7याशिवाय, लोक बँकेने दिलेल्या सुविधांचाही लाभ घेतात. जसे- एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग इत्यादी. बँकेप्रमाणेच लोक पोस्ट ऑफिसमध्येही बचत खाते उघडतात आणि येथे उपलब्ध सुविधांचा लाभ घेतात. 3 / 7पोस्ट ऑफिस भारत सरकारचे आहे, ज्याद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. पण तुम्ही पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगचा फायदा घेता का? नसल्यास, त्यासाठी अर्ज कसा करायचा? त्याबद्दल काही स्टेप्स जाणून घेऊया. फक्त यासाठी, ग्राहकाचे वॅलिड, अॅक्टिव्ह, सिंगल किंवा जॉइंट् बचत खाते असले पाहिजे.4 / 7नेट बँकिंगचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या होम ब्रँचमध्ये जाऊन प्री-प्रिंटेड अर्ज करावा लागेल. यासह, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जमा करावी लागतील, आणि नंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.5 / 7तुमच्या फॉर्मची पुढील प्रक्रिया होताच, तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक एसएमएस येईल. यामध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्हाला या पेजवर जावे लागेल आणि त्यानंतर New User Activation या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.6 / 7आता तुम्हाला येथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा इंटरनेट बँकिंग लॉगिन पासवर्ड आणि पैशांच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा पासवर्ड देखील तयार करावा लागेल.7 / 7आता तुम्हाला येथे काही प्रश्न विचारले जातील, ज्यासाठी तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील. हे सुरक्षिततेसाठी केले जाते. यानंतर तुम्ही तुमच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications