शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income Tax Tips: दरमहा इन्कम टॅक्स कापला जातो? पैसे वाचवायचे असतील तर हे कराच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:17 PM

1 / 8
पगारदारांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘पे स्लिप’. पगाराचा आकडा व खर्चाची जुळवणी यांमुळे पगारात थोडी जरी कपात झाली तरी पगारदार खट्टू होतात. दर महिन्याला कापला जाणारा इन्कम टॅक्सही पगारदारांसाठी चिंतेचे कारण ठरतो. त्यामुळे गुंतवणुकीचे मार्ग शोधले जातात.
2 / 8
पगारातून दरमहा कापला जाणारा इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर पुढील उपाय योजता येतील.
3 / 8
इन्कम टॅक्स कायद्यातील कलम ८० सी अनुसार पगारदारांनी दीड लाखांपर्यंत केलेली गुंतवणूक करमुक्त असते. त्यामुळे एलआयसी वा पीपीएफ या पारंपरिक बचतीच्या उपायांना पगारदारांची सर्वाधिक पसंती असते. यात गुंतवणूक केल्यास करबचतही होते आणि परतावेही प्राप्त होतात.
4 / 8
हाही बचतीचा एक चांगला पर्याय आहे. नॅशनल पेन्शन स्कीम ही सरकारी योजना असून यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. परतावाही चांगला मिळतो व करबचतही होते.
5 / 8
८०सीसीडी (२डी) या अंतर्गत विविध प्रकारच्या पेन्शन फंडांमध्ये गुंतवणूक केली असता इन्कम टॅक्स वाचवता येतो.
6 / 8
कलम ८०डी अनुसार आरोग्य विमाही करसवलतीसाठी उपयुक्त ठरू शकतो. वेगवेगळ्या आरोग्य विम्यांची करसवलतीची मर्यादाही वेगवेगळी आहे.
7 / 8
अधिकाधिक लोकांनी स्वमालकीचे घर घ्यावे यासाठी बँका आकर्षक व्याजदारवर कर्ज देतात. इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी गृहकर्ज हा उत्तम उपाय आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या २४ब अंतर्गत गृहकर्जावरील व्याजावर करसवलत आहे.
8 / 8
दिव्यांगांनाही करसवलत मिळू शकते. सामाजिक कामासाठी दान दिले असेल तर कलम ८०जी अंतर्गत करसवलत मिळते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय