शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 4:37 PM

1 / 9
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की, त्याला कर्ज घेण्याची गरज पडते. त्यावेळच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ते गरजेचंही असते. पण, अनेकदा लोक अशा चुका करतात की, चांगलं व्हावे म्हणून घेतलेले कर्ज तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलत जाते.
2 / 9
म्हणजे काय तर कर्ज घेतल्यानंतर बऱ्याचदा अशी स्थिती येते की, घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते आणि व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकत जातो. त्याला इंग्रजीमध्ये डेट ट्रॅप (कर्जाचा सापळा) म्हणतात. ते का होतं हे समजून घ्या...
3 / 9
होतं असं की, बऱ्याचदा तुम्ही इतके कर्ज घेता की ते फेडण्याची तुमची आर्थिक क्षमता नसते. मग ते कर्ज ओझ्यासारखं होतं आणि नंतर तुम्ही त्यातून सुटका करून घेण्यासाठी दुसरे कर्ज घेता.
4 / 9
यामुळे आर्थिक स्थैर्य पूर्णपणे संपून जाते. कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची सुरूवात बऱ्याचदा ईएमआय चुकण्यापासून होते. कारण त्यामुळे व्याजदर वाढतो आणि तुमच्यावर आर्थिक दडपणही वाढते. ते कशामुळे हे समजून घ्या...
5 / 9
जर तुमच्या ईएमआयचा हफ्ता हा तुमच्या पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर समजा गडबड आहे. म्हणजे तुमचा पगार ५० हजार आहे आणि तुमचा ईएमआय २५ हजारापेक्षा जास्त आहे, तर तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊन ठेवले आहे.
6 / 9
तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त कर्ज घेऊन ठेवले असेल, तर त्यामुळे तुमची आर्थिक डबमळीत होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही गरजेपेक्षा जास्त क्रेडिट कार्डवर अवलंबून असाल, तर तेही तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
7 / 9
तुमच्या पगारातील एकूण रकमेपैकी ७० टक्के रक्कम घरातील वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च होत असेल, तर त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणीत येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीच बचत करत नसाल, तर याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाहीये.
8 / 9
त्यासाठी आधी तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा. तुमच्यावर कर्ज आहे हे स्वीकारा आणि तुम्हाला किती देणी द्यायची आहेत, त्याची यादी बनवा. त्यानंतर किती खर्च करायचा यासाठी विशिष्ट रक्कम ठरवा. इतर खर्च पूर्णपणे बंद करा. जास्तीत जास्त पैसे कर्ज फेडण्यासाठी खर्च करा.
9 / 9
ज्या कर्जावर सर्वाधिक व्याज देत आहात, ते फेडण्यासाठी प्रयत्न करा. अधूनमधून मोठी रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. कर्ज घेतल्यांसोबत काही तडजोडी करू शकतात जसे व्याज कमी करणे किंवा काही रक्कम माफ करू घेणे. त्याचबरोबर घरातील असे सामान ज्याची तुम्हाला गरज नाही, ते विकून त्यातून परतफेड करू शकतात.
टॅग्स :businessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक