शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चहा बंद करा करोडपती बनाल! थोडे थोडके नाही, 'या' फॉर्म्युलातून १० कोटी रुपये कमवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 1:55 PM

1 / 8
कोरडपती बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी अनेकजण कष्टही करत असतात. पण, फक्त कष्ट करुन करोडपती होता येत नाही. यासाठी बचत महत्वाची असते. तुम्ही जर योग्य पद्धतीने पैशाची बचत केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता.
2 / 8
आम्ही आज तुम्हाला करोडपती बनण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे. हा फॉर्म्युला दोन वेळच्या चहाचा आहे. तुम्हाला फक्त दोन वेळचा चहा बंद करायचा आहे. हा फॉर्म्युला वाचून धक्का बसला असेल. पण हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवू शकतो.
3 / 8
खरतर चहा आपल्या शरीरासाठी अपायकारक असतो. डॉक्टर अनेकांना चहा न पिण्याचा सल्ला देतात. पण, चहाची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण दररोज चार ते पाच कप चहा पितो. यातून आपले पैसेही खर्च होत असतात. चहाची किंमत १० ते २० रुपये असते त्यामुळे रोज पैसे आपल्याला लक्षात येत नाहीत. पण रोजचे हेच २० रुपये तुम्ही वाचवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता.
4 / 8
चहा सोडण्याचे आपल्याला डबल फायदे मिळतात. आपण दिवसाची सुरुवात चहाने करतो. तर अनेकजण अनेकवेळा चहा पितात. या लोकांना चहा सोडणे अवघड असते, पण अशक्य नाही आणि तेही जेव्हा आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. चहा सोडून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्ती लागते ती तुम्ही केली तर तुम्हीही करोडपती होऊ शकता.
5 / 8
आता आपण या फॉर्म्युलाच गणित कस आहे पाहूया. आपल्याकडे एक कप चहाची किंमत १० रुपये आहे. जर तुम्ही दररोज दोन कप चहाचे पैसे वाचवले तर तुम्ही २० रुपये वाचवता. ही रक्कम महिन्याची केली तर ६०० रुपये होतात. या ६०० रुपयांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपतीही होऊ शकता. यासाठी तुम्हाला ही रक्कम दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवावी लागेल. म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीत जबरदस्त परतावा देतात. जे १५ ते २० टक्के तुम्हाला परतावा मिळू शकतो.
6 / 8
तुम्ही दोन कप चहाच्या पैशांची सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक करु शकता. अशा प्रकारे, जर २० वर्षांच्या तरुणाने म्युच्युअल फंडात एका महिन्यात ६०० रुपयांची एसआयपी केली. तर मग ही रक्कम ४८० महिने किंवा ४० वर्षांसाठी गुंतवून तुम्ही एकूण २,८८,००० रुपये जमा करु शकता.
7 / 8
दुसरीकडे, जर तुम्ही या कालावधीत १५% परतावा पाहिला तर तुमची जमा झालेली रक्कम १,८८,४२,२५३ रुपये असेल. आता जर तुम्ही SIP मध्ये २०% रिटर्नच्या आधारावर पाहिले तर तुमची रक्कम १०,१८,१६,७७७ रुपये होऊ शकतात.
8 / 8
या फॉर्म्युलाचा वापर करुन तुम्ही जर बचत केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. महिन्याचे ६०० रुपये बचत खात्यात साठवले तर तुम्ही २० वर्षानंतर करोडो रुपयांची बचत होऊ शकते.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक