शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

How to become Rich: दररोज करा १०० रुपयांची बचत, असा जमा होईल १ कोटींचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 9:41 AM

1 / 8
Scheme To Become Millionaire: नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा व्यापारी, आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक वेळा चांगली कमाई करूनही लोकांना बचत करता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
2 / 8
पण जर पैसा योग्य प्रकारे गुंतवला तर तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एक्सपर्ट्सच्या अशा पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दररोज केवळ १०० रुपये वाचवून कोट्यवधींचा निधी जमा करू शकता.
3 / 8
तुमचा पगार कमी असला तरी तुम्ही दररोज १०० रुपये सहज वाचवू शकता. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणूकीची गरज नाही.
4 / 8
बरेचदा असंही होतं की अनेक जण पगारात वाढ होण्याची वाट पाहत बसतात. पगार वाढला की गुंतवणूक सुरू असं त्यांचं म्हणणं असतं. पण प्रत्यक्षात मात्र तसं क्वचितच घडतं आणि गुंतवणूकही केली जाते.
5 / 8
तुम्ही दररोज १०० रुपये वाचवून १ कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे एसआयपी. एसआयपीद्वारे, तुम्ही फक्त १०० रुपयांची बचत करून १ कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता.
6 / 8
याचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. असे काही फंड आहेत ज्यांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. आजकाल बहुतेक लोकांना म्युच्युअल फंडांबद्दल माहिती आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीद्वारे, तुम्हाला दररोज १०० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करावी लागेल.
7 / 8
जर तुम्ही दररोज १०० रुपये वाचवले तर एका महिन्यात तुमचे ३ हजार रुपये वाचतील. जर तुम्ही हे म्युच्युअल फंडात गुंतवले आणि तुम्हाला २० टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळत असेल, तर २१ वर्षांत म्हणजे २५२ महिन्यांत तुमच्याकडे सुमारे १,१६,०५,३८८ रुपयांचा फंड जमा होईल.
8 / 8
या काळात तुम्ही एकूण ७,५६,००० रुपये जमा कराल. तुम्हाला जर २० टक्क्यांऐवजी १५ टक्के परतावा मिळाला तरीही तुम्हाला सुमारे ५३ लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला कमी वेळात कोट्यवधींचा निधी जमा करायचा असेल तर तुमच्या स्वतःच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक