शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोनं खरं आहे की खोटं?, 'या' 4 सोप्या पद्धतीने घरबसल्या ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 6:44 PM

1 / 8
नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून सोने (Gold) खरेदी करणे हे लोकांचे स्वप्न राहिले आहे. सोने खरेदी करताना लोकांना अनेकदा भीती वाटते की, ते शुद्ध सोने आहे की नाही. सोन्यात भेसळ झाली, तर त्याची चमकही निघून जाते, तसेच पैसाही वाया जातो.
2 / 8
सोने ही अशी वस्तू आहे, ज्याची मागणी वर्षाचे 12 महिने कायम असते. वैवाहिक आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी जास्त वाढते. आजकाल सोन्याचा भाव 50 हजार तोळ्याच्या (10 ग्रॅम) वर आहे.
3 / 8
अशा परिस्थितीत दुकानदारांनी तुम्हाला दिलेल्या सोन्यात थोडीशीही भेसळ केली तर ते काही क्षणात तुमची हजारो रुपयांची फसवणूक करू शकतात. यासाठी सोन्यात तांबे, जस्ता आणि चांदी मिसळली जाते. ही भेसळ इतक्या बारकाईने केली जाते की ती सहजासहजी कोणाच्याही लक्षात येत नाही.
4 / 8
तुमचे सोने किती शुद्ध आहे, हे तुम्ही काही घरगुती उपायांनी सहज ओळखू शकता (How to Check Gold Genuinity). यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे व्हिनेगर वापरू शकता. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब टाकून पाहा. जर सोन्याच्या रंगात काही बदल झाला तर ते नकली आहे, असे समजा आणि जर काही बदल झाला नाही तर ते शुद्ध सोने आहे, असे समजून घ्या.
5 / 8
दुसरा मार्ग म्हणजे सोने घामाच्या संपर्कात ठेवण्याचा. शरीराला घामाच्या संपर्कात आल्यावर सोन्याला एखाद्या नाण्यासारखा दुर्गंधी येऊ लागली तर त्यात भेसळ आहे असे समजावे. दरम्यान, शुद्ध सोन्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही.
6 / 8
तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही सोन्याचे दागिने खरवडून त्यावर नायट्रिक ऍसिडचे काही थेंब टाका, जर त्याचा रंग हिरवा झाला तर सोने नकली आहे. शुद्ध सोन्याचा रंग बदलत नाही. मात्र, तुम्हाला अशाप्रकारे तपासणी करताना सावधगिरी बाळगावी लागेल कारण ऍसिडमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
7 / 8
चौथा मार्ग म्हणजे पाण्याचा वापर करणे. एक बादली पाण्याने भरा आणि त्यात सोन्याचे दागिने घाला. हे दागिने बुडाले तर ते सोने शुद्ध आहे, असे समजावे. जर ते काही काळ तरंगत असेल तर समजून घ्या की सोने नकली आहे. दरम्यान, सोने कितीही हलके आणि कितीही कमी असले तरी ते नेहमी पाण्यात बुडते.
8 / 8
सोन्यात भेसळ होऊ नये म्हणून लोकांनी नेहमी ISI चा हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोने खरेदी करावे. त्यावर हा हॉलमार्क असेल म्हणजे सोने शुद्ध आहे. यासोबतच ब्रँडेड दुकानातून सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तेथे सोने खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे दिली जातात. अशा परिस्थितीत, सोन्याचे नुकसान झाल्यास आपण तेथे नुकसानभरपाईचा दावा देखील करू शकता.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय