शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुचाकी चोरीला गेल्यास इन्शुरन्श कसा क्लेम करायचा? कुठले दावे फेटाळतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 1:19 PM

1 / 6
वास्तविक, जर तुम्ही बाईकसाठी सर्वसमावेशक (कॉम्प्रिहेन्सिव) विमा पॉलिसी घेतली असेल, तर विमा कंपनी चोरी गेलेल्या गाडीची भरपाई करेल. कॉम्प्रिहेन्सिव पॉलिसीमध्ये, थर्ड पार्टी क्लेम, चोरी आणि आग यांसारख्या प्रकरणांमध्ये विमा कंपनीकडून गाडीच्या किमतीचा दावा करू शकतात.
2 / 6
FIR : तुमची बाईक चोरीला गेल्यास पहिला काम म्हणजे जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा. या FIR ची प्रत तुमच्याकडे घ्यायला विसरू नका. ही अधिकृत कागदपत्रे तुमच्या विमा दाव्यासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून कामी येतात.
3 / 6
विमा कंपनीला कळवा : पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर तात्काळ विमा कंपनीला घटनेची माहिती द्या. तुम्हाला कंपनीच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील.
4 / 6
क्लेम फॉर्म भरा : वाहन चोरीसाठी तुम्हाला कंपनीचा क्लेम फॉर्म भरावा लागेल. भरलेल्या क्लेम फॉर्मसोबत, तुम्हाला एफआयआर, वाहनाची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची एक प्रत विमा कंपनीच्या पत्त्यावर ई-मेल करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला एफआयआरच्या प्रतीसह वाहन चोरीची माहिती आरटीओलाही द्यावी लागेल.
5 / 6
अप्रूव्हल सेटलमेंट : पोलिसांनी कारचा 'नॉनट्रेसेबल रिपोर्ट' सादर केल्यानंतर, पॉलिसीधारकाने चोरीच्या वाहनाची नोंदणी विमा कंपनीच्या नावे हस्तांतरित करावी लागते. तुम्हाला गाडीच्या चाव्या विमा कंपनीकडे जमा कराव्या लागतील. वाहनाचा ताबा कंपनीकडे सुपूर्द करण्यासाठी सब्रोगेशन लेटर द्यावे लागेल.
6 / 6
क्लेम पेमेंट : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, विमा कंपनी तुमचा क्लेम मंजूर करेल. विम्याची रक्कम मालकाला ७ ते ८ दिवसांत दिली जाते. जर तुम्ही पॉलिसी घेताना रिटर्न टू इनव्हॉइस ॲड-ऑन कव्हर घेतले असेल, तर तुम्हाला गाडीची संपूर्ण मूल्य मिळते. परंतु, जर हे कव्हर केले नसेल तर तुम्हाला कारच्या सध्याच्या विमा उतरवलेल्या घोषित मूल्याच्या बरोबरीची रक्कम दिली जाईल म्हणजेच IDV.
टॅग्स :bikeबाईकCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी