How to gain weight again?, Netizens puzzled after seeing Anant Ambani's photos of engagement
Anant Ambani: कमी झालेलं वजन पुन्हा कसं वाढलं?, अनंत अंबानींचे फोटो पाहून नेटीझन्स कोड्यात By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 6:15 PM1 / 10मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा झाला आहे. अंबानी कुटुंबाने हा कार्यक्रम आपल्या घरीच अर्थात अँटिलियामध्येच धुमधडाक्यात पार पाडला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमास बॉलीवुड पासून ते क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.2 / 10या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहेत. यात अनंत आणि राधिका आपल्या कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. मात्र, कोरोना अगोदर आपलं वजन कमालीचं घटवलेल्या अनंत यांचं वाढलेलं वजन पाहून नेटीझन्स कोड्यात पडले आहेत.3 / 10अनंत यांनी साधारण १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केलं होतं. त्यांच्या कमी झालेल्या वजनाची चर्चाही तेव्हा मोठ्या प्रमाणात झाली होती. स्वत: शाहरुख खाननेही याबद्दल अनंतला विचारले होते.4 / 10रिलायन्सच्या एका कार्यक्रमात आणि आयपीएल सामन्यात अनंत अंबानींचे कमी झालेले वजन सर्वांनीच पाहिले होते, IPL सामन्यादरम्यान अनंत अंबानी एका सोफ्यावर बसून क्रिकेटचा सामना पाहत होता.5 / 10अनंत यांचे आजही सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संसोबतचे कमी वजनातील फोटो सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत.मोठ्या मेहनतीने त्यांनी आपले वजन कमी केलो होते. मात्र, आता साखरपुड्यातील फोटोत पुन्हा एकदा त्यांचे वजन पूर्वीप्रमाणेच वाढल्याचे दिसून येते.6 / 10अनंत वजन कमी करण्यासाठी दररोज सुमारे ५ तास व्यायाम करायचा, ज्यामध्ये २० किलोमीटर चालणे आणि योगासनांचा समावेश होता. शारिरीक कष्ट घेऊन त्यांनी वजन घटवले होते 7 / 10अनंत हेल्दी डाएटमध्ये कमी कार्ब, हाय फायबर फूडसोबत ताजी फळे आणि भाज्या खायचे, याशिवाय त्यांनी तेलकट आणि गोड पदार्थ खाणेही त्याने टाळले होते. व्यायाम आणि योगासनांचा परिणाम स्पष्ट जाणवत होता. 8 / 10अनंत हेल्दी डाएटमध्ये कमी कार्बन, हाय फायबर फूडसोबत ताजी फळे आणि भाज्या खायचे, याशिवाय त्यांनी तेलकट आणि गोड पदार्थ खाणेही त्याने टाळले होते. व्यायाम आणि योगासनांचा परिणाम स्पष्ट जाणवत होता. 9 / 10 आता, वाढलेलं वजन कमी केल्यानंतर ते मेंटेन ठेवणंही तितकंच आवश्यक असतं. मात्र, तुम्ही ते मेंटेन न केल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणेच तुमचे शरीर जाड होऊ शकते, तुमचे वजन वाढू शकते. 10 / 10वजन कमी झाल्यानंतरही तुम्हाला व्यायाम, योगासने आणि डाएट प्लॅनवर विशेष लक्ष केंद्रीत करावे लागतं. अन्यथा ते पुन्हा वाढते. कदाचित अनंत अंबानींचा तो सातत्यपणा न राहिल्यानेच पुन्हा त्यांचे वजन वाढले असावे, अशी शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications