how to invest in nps extra rs 50000 tax saving in investing nps best retirement plan
NPS Account: जितका पगार, तितकच मिळवा पेंन्शन; कसं? फक्त एवढं काम करा अन् उतारवयात सुखानं जगा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 8:16 AM1 / 9तुम्हाला नोकरीदरम्यान जेवढा पगार मिळतोय, तेवढीच रक्कम निवृत्तीनंतरच्या निवृत्ती वेतनाप्रमाणे मिळेल, असं सांगितलं तर? म्हातारपण अगदी मौजमजेत जाईल. पण हे कसं शक्य आहे? यासाठी तुम्हाला फक्त NPS मध्ये खातं उघडावं लागेल. आता तुमला प्रश्न पडला असेल की हे NPS म्हणजे काय आणि त्यात खातं उघडून तुम्हाला पगारा इतकं पेन्शन कसं मिळेल? 2 / 9NPS (National Pension System) म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळावं, हे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. NPS मध्ये पैसे जमा केल्यानंतर, निवृत्तीनंतर एक मोठा निधी उपलब्ध होतो. तसेच, तुमची अॅन्युइटी रक्कम आणि त्याच्या कामगिरीच्या आधारावर तुम्हाला मासिक पेन्शन मिळते.3 / 9राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच या योजनेत गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ते सर्व वर्गातील लोकांसाठी खुले करण्यात आले. म्हणजेच प्रत्येकजण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.4 / 9हे खातं तुम्ही तुमच्या नावानं किंवा तुमच्या पत्नीच्या नावानं उघडू शकता. या योजनेत वयाच्या ६० वर्षांनंतर एकरकमी रोख आणि मासिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. १८ ते ७० वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक NPS मध्ये गुंतवणूक करू शकतो. 5 / 9NPS खात्यात मासिक किंवा वार्षिक गुंतवणूक सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही NPS मध्ये रु. 1,000 पासून महिन्याला गुंतवणूक सुरू करू शकता. ज्याला तुम्ही वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत चालवू शकता. NPS गुंतवणुकीवर 40 टक्के वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे. तर 60 वर्षानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते.6 / 9खासगी नोकरी धारक एनपीएस खाते उघडून सेवानिवृत्ती योजनेसह अतिरिक्त कर सूटचा लाभ देखील घेऊ शकतात. केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकही यामध्ये खाते उघडू शकतात. तुम्ही घरी बसून ऑनलाइन (eNPS) खाते उघडू शकता. NPS हे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे चालवलं जातं, ज्यामुळे ते खूप सुरक्षित आहे. गेल्या काही वर्षांत NPS खाती मोठ्या प्रमाणात उघडली गेली आहेत.7 / 918 ते 70 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक खातं उघडू शकतो. तुम्ही कोणत्याही बँकेत NPS खाते उघडू शकता. मुदतपूर्तीनंतर, गुंतवणूकदार NPS मधून 60 टक्के पैसे काढू शकतात. म्हणजेच, वयाच्या ६० नंतर, एखादी व्यक्ती एनपीएसमध्ये जमा केलेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम कोणत्याही कराशिवाय काढू शकते. NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत. टियर-1 आणि टियर- 2. टियर-1 मधून 60 वर्षे वयापर्यंत निधी काढता येणार नाही. टियर-2 एनपीएस खाते बचत खात्यासारखे काम करते, जेथून ग्राहक त्याच्या गरजेनुसार पैसे काढू शकतो.8 / 9उदाहरणार्थ, तुमचे वय ३० वर्षे असल्यास आणि तुम्ही एनपीएस खात्यात दरमहा ५,००० रुपये गुंतवले आणि ३० वर्षे गुंतवणूक करत राहीलात. म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत. त्या गुंतवणुकीवर तुम्हाला १०% परतावा मिळाल्यास, वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्या NPS खात्यात एकूण १.१२ कोटी रुपये जमा होतील. नियमानुसार, तुमचे वय 60 वर्षे पूर्ण होताच तुम्हाला 45 लाख रुपयांची एकरकमी रोकड मिळेल. याशिवाय दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. तर गुंतवणूकदार 30 वर्षांत एकूण 18 लाख रुपयांची गुंतवणूक करेल. यामध्ये 10 टक्के वार्षिक परताव्याचा अंदाज आहे, व्याजदरात चढ-उतार होऊ शकतात.9 / 9समजा तुमचे वय आता ३५ वर्षे आहे, तर तुम्हाला पुढील २५ वर्षे म्हणजे ६० वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. या स्थितीत तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा १५ हजार रुपये गुंतवले तर आजपासून २५ वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ५० हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळेल. NPS ट्रस्ट कॅल्क्युलेटरनुसार, दरमहा १५ हजारांची गुंतवणूक करून, तुम्ही पुढील २५ वर्षांत एकूण ४५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. सरासरी १० टक्के परतावा गृहीत धरल्यास, मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम २ कोटी रुपये असेल. मॅच्युरिटीनंतर, तुम्ही ५० टक्के अॅन्युइटी घेता आणि अॅन्युइटी दर सहा टक्के गृहीत धरल्यास, त्यानुसार मासिक पेन्शन ५०,१७१ रुपये होते. आणखी वाचा Subscribe to Notifications