शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

How to Save Income Tax: कोणत्याही फंदात पडू नका, इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 'या' आहेत सरकारी पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 2:38 PM

1 / 7
देशात लोक इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. अनेक वेळा बेकायदेशीरपणे आयकर वाचवण्याची प्रकरणेही समोर येतात. मात्र देशातील सरकारने कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. प्रत्येक करदाता याचा वापर करू शकतो आणि या सर्व पद्धती वैध आहेत.
2 / 7
आयकर कायदा 1962 मध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्यांच्या मदतीने करदाते कर वाचवू शकतात. देशातील सरकार अशा अनेक योजना चालवते, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकरात सूट मिळू शकते.
3 / 7
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वर सध्या ७.१ टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवल्यास कर सूट मिळू शकते. पीपीएफमधील गुंतवणूकीवर सरकार हमी देते, म्हणजे पैसे बुडणार नाहीत.
4 / 7
कर सूट मिळविण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकारची ही योजना मुलींसाठी आहे. सध्या या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर ७.६ टक्के दराने व्याज मिळत आहे. यापूर्वी, या योजनेत 80C अंतर्गत केवळ दोन मुलींच्या खात्यावर कर सूट उपलब्ध होती. मात्र सरकारने त्यात बदल केला आहे. नवीन नियमानुसार, एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली आल्यास तरी त्यांच्या नावे उघडलेल्या खात्यावरही कर सूट दिली जाईल.
5 / 7
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधील गुंतवणूकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत देखील कर सूट देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक १.५ लाख आणि अतिरिक्त ५० हजार रुपये गुंतवू शकता. NPS मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही प्राप्तिकरात एकूण २ लाख रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
6 / 7
ज्येष्ठ नागरिकांसाठी (SCSS) ही एक उत्तम योजना आहे. या अंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत बचत खाती उघडता येतात. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सूट मिळू शकते. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे.
7 / 7
ज्येष्ठ नागरिकांसाठी (SCSS) ही एक उत्तम योजना आहे. या अंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत बचत खाती उघडता येतात. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सूट मिळू शकते. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सbusinessव्यवसाय