How to submit Date Of Exit Previous company in EPFO? Know stape by step Process in Marathi
EPFO: कंपनी बदलल्यावर तुमची तुम्हीच 'डेट ऑफ एक्झिट' टाकू शकता, जाणून घ्या प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 9:38 AM1 / 10खासगी कंपन्यांमध्ये काम करताना पगारात वाढ असेल किंवा चांगली संधी कंपन्य़ा बदलाव्या लागतात. अशावेळी जुनी कंपनी ईपीएफओकडे तुम्ही केव्हा नोकरी सोडली त्याची तारीख अपडेट करेलच असे नाही. बहुतांश कंपन्या करत नाहीत. अनेकदा त्या कंपन्यांच्या एचआरच्या पाया पडावे लागते. कंपन्यांच्या या मनमानीला ईपीएफओने बऱ्याच अंशी चाप लावला आहे. आता तुम्हीच तुमची जुन्या कंपनीतील शेवटचा दिवस कोणता हे ईपीएफओला सांगू शकणार आहात. 2 / 10काही वर्षांपूर्वी ईपीएफओच्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत होते. आता सर्व ऑनलाईन होत असल्याने बरीच कामे तुम्ही ईपीएफओच्या वेबसाईटवरून करू शकता. पैसे काढायचे असतील किंवा नॉमिनी बदलायचा असेल किंवा अन्य कोणतेही काम तुम्ही स्वत: करू शकता. तसेच तुम्ही तुमची डेट ऑफ एक्झिट देखील टाकू शकता. 3 / 10आता नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतून बाहेर पडण्याची तारीख (Date of Exit) भरणे किंवा जुन्या पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम नवीन पीएफ खात्यात हस्तांतरित करण्याचे काम काही मिनिटांत घरी बसून करता येते. जाणून घ्या Date of Exit कशी भरावी...4 / 101. Date of Exit भरण्यासाठी, तुम्हाला पीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/). तुमच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डने या पोर्टलवर लॉग इन करा.5 / 102. आता 'मॅनेज' टॅबवर क्लिक करा. येथे ड्रॉप डाउन सूचीच्या तळाशी 'मार्क एक्झिट' हा पर्याय दिसेल. यानंतर 'मार्क एक्झिट' वर क्लिक करा.6 / 103. आता 'सिलेक्ट एम्प्लॉयमेंट' समोरील ड्रॉप डाउन सूचीमधून तो पीएफ नंबर निवडा, ज्यामध्ये तुम्हाला 'एक्झिटची तारीख' भरायची आहे.7 / 104. आता कंपनी सोडण्याची तारीख भरल्यानंतर, कारण निवडा आणि मंजुरी घेण्यासाठी संलग्न चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर 'OTP' वर क्लिक करा.8 / 105. 'Request OTP' वर क्लिक केल्यानंतर, 'आधार' शी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल.9 / 106. मोबाईलवर मिळालेला OTP टाकल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा. आता तळाशी सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल.10 / 10कंपनीतून बाहेर पडण्याची तारीख भरण्याची ही सुविधा खूप चांगली आहे, परंतु तुम्ही हे काम कंपनीने भरलेल्या शेवटच्या पीएफ कॉन्ट्रीब्युशनच्या दोन महिन्यांनंतरच करू शकता. यानंतर तुम्ही पीएफ काढू देखील शकता किंवा नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर करू शकता. यासोबतच तुमचा सध्याचा मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला पाहिजे, तरच तुम्हाला OTP मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications