शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेबिट आणि क्रेडिट कार्डला कसं कराल टोकनाईज? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 10:54 AM

1 / 7
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट आणि क्रेडिट कार्डबाबत 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम जारी केला आहे. या नियमानुसार, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा डेटा ऑनलाइन, पॉईंट ऑफ सेल आणि अ‍ॅप व्यवहारासाठी अनन्य टोकनमध्ये रूपांतरित करावा लागेल.
2 / 7
या नियमांमध्ये मर्चंट किंवा ऑनलाइन ई कॉमर्स साइटवर कार्डच्या डिटेल सेव्ह करता येणार नाहीत. हा नियम अंमलात आणण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 30 जून होती, जी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली गेली. टोकनायझेशन ग्राहकांना त्यांच्या कार्डांशी संबंधित जास्तीत जास्त सुरक्षा मिळेल. कार्डांची तपशील लिक होण्याची शक्यता नसेल.
3 / 7
सध्या, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला कार्डाचा तपशील द्यावा लागतो. एकदा माहिती शेअर केल्यानंतर, संपूर्ण व्यवहार फक्त OTP द्वारे केला जातो. मात्र टोकनायझेशनचा नियम लागू झाल्याने आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलेल.
4 / 7
या प्रक्रियेत तुमचे कार्ड तपशील कोडमध्ये रूपांतरित केले जातील. या प्रक्रियेला 'टोकनिंग' म्हणतात. म्हणजेच तुमच्या कार्डचा कोणताही नंबर व्यापारी कंपनीसोबत शेअर केला जाणार नाही. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय.
5 / 7
हे सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्या ठिकाणाहून खरेदी करायची आहे अशा कोणत्याही ई कॉमर्स वेबसाईट किंवा अॅपवर जा. त्या ठिकाणी पेमेंट ट्रान्झॅक्शन सुरू करा. चेकआऊटपूर्वी सेव्ह डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची माहिती भरा आणि अन्य माहिती द्या.
6 / 7
यानंतर सिक्युअर युअर कार्ड एजवर आरबीआय गाईडलाईन अथवा टोकनाईज युअर कार्ज एजवर रिझर्व्ह बँक गाईडलाईन्सला सिलेक्ट करा. यानंतर बँकेकडून तुम्हाला एक ओटीपी मोबाइल किंवा ईमेवर पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून आपलं ट्रान्झॅक्शन पूर्ण करा.
7 / 7
यानंतर तुमचं टोकन जनरेट होईल आणि ते सेव्ह होईल. जी तुम्ही माहिती दिली आहे ती टोकनच्या रुपात बदलली जाईल. पुढील वेळी जेव्हा तुम्ही त्या साईटवर किंवा अॅपवर जाल तेव्हा त्या कार्डाचे अखेरचे चार डिजिट तुम्हाला दिसतील. यामुळे तुम्हाला कार्ड ओळखण्यास मदत होईल. हीच टोकनायझेशन प्रणाली आहे.
टॅग्स :bankबँक