शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Online PF Transfer Process : नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 8:53 AM

1 / 8
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ​​ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सना ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. ऑनलाइन नामांकन भरणे, नवीन UAN क्रमांक तयार करण्यापासून ते EPF खात्यातून पैसे काढण्यापर्यंत या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.
2 / 8
या काही गोष्टी आहेत ज्या ईपीएफ सदस्य ऑनलाइन करू शकतात. याशिवाय, युझर्स त्यांचे EPFO ​​KYC अपडेट करू शकतात, त्यांची EPFO ​​शिल्लक तपासू शकतात आणि त्यांचा EPF क्लेमही ऑनलाइन करू शकतात. याशिवाय ईपीएफ सदस्य त्यांची ईपीएफमधील रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतात.
3 / 8
जर तुम्ही नुकतीच नोकरी बदलली असेल आणि तुम्हाला तुमचा पीएफ तुमच्या आधीच्या कंपनीतून सध्याच्या कंपनीत हस्तांतरित करायचा असेल, तर आता तुम्ही घरी बसल्या क्षणात ते करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल कसे करता येईल? तर पाहूया सोप्या स्टेप्स…
4 / 8
तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या EPF खात्यात लॉग इन करा. https://epfindia.gov.in/site_en/index.php या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट लॉग इन पेजवर पोहोचून शकता. त्यानंतर तुम्हाला Online Services हा ऑप्शन निवडावा लागेल.
5 / 8
यानंतर 'One Member–One EPF Account (Transfer Request)' हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा वैयक्तिक डेटा आणि सध्याच्या पीएफ अकाऊंटची माहिती व्हेरिफाय करा. त्यानंतर जेव्हा तुमची माहिती व्हेरिफाय होईल तेव्हा अकाऊंटची माहिती पाहण्यासाठी Get Details ऑप्शन सिलेक्ट करा.
6 / 8
यानंतर क्लेम फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मागील किंवा सध्याच्या कंपनीला निवडा. कोणत्याही एका कंपनीला निवडा आणि आपला मेंबर आयडी किंवा युएएन टाइप करा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवण्यासाठी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा.
7 / 8
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि सबमिट करा. तुम्हाला आता तुमचा ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर्म सेल्फ अटेस्टेड करावा लागेल. त्यानंतर तुमच्या मागील कंपनीला तुमच्या पीएफ ट्रान्सफर रिक्वेस्टबाबात माहिती दिली जाईल.
8 / 8
एकदा तुमच्या कंपनीने EPF ट्रान्सफरची विनंती मंजूर केल्यानंतर, तुमचा PF तुमच्या निवडलेल्या खात्यात ट्रान्सफर स्केला जाईल. तुमचे EPF ट्रान्सफर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सूचना प्राप्त होईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीonlineऑनलाइन